Air India | (Photo Credits: ANI)

चीनमध्ये थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रभाव पाहता आता भारताने देखील त्याचा धोका टाळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान काल एअर इंडियाकडून विशेष विमानाची सोय करून चीनमधील वुहान (Wuhan) शहरातून सुमारे 324 जणांना दिल्लीमध्ये आणण्यात आले आहेत. आता एअर इंडियाकडून (Air India) आज (1 फेब्रुवारी) दिवशी 12.50 वाजता दिल्लीहून वुहानकडे विशेष विमान रवाना होणार आहे. दरम्यान या टीममध्ये कॅप्टन अमिताभ सिंग यांचा समवेश असणार आहे.  Coronavirus: चीन मध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान दिल्लीत दाखल

चीनमध्ये वुहान या शहरापासूनच कोरोना वायरसची लागण होण्यास सुरूवात झाली. सर्वाधिक रूग्ण या शहरामध्ये आढळले आहेत. चीन सरकारने सध्या वुहान या शहरात वाहतूक बंद ठेवली आहे. या शहरात जाण्या-येण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान चीनमधील भारतीयांच्या मदतीसाठी खास विमान दिल्लीवरून वुहानला जाणार आहे. अनेक भारतीय विद्यार्थी चीनमध्ये उच्च शिक्षणासाठी जातात. त्यांच्या मदतीसाठी भारत सरकारने हे विशेष पाऊल उचलले आहे. नुकतीच भारतीय आरोग्य मंत्रालयाकडून विशेष अ‍ॅडव्हायजरी देखील जाहीर करण्यात आली आहे. Coronavirus: जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणजे काय? WHO ती का जाहीर करते?

ANI Tweet

दरम्यान काल विशेष विमानाने भारतात आणलेल्या चीन मधील भारतीयांना आता इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस चावला कॅम्प मध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. एअर इंडियाच्या पहिल्या खास विमानाने भारतात आलेल्या 324 जणांमध्ये 3 लहान बालकं आणि 211 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.