Coronavirus: चीन मध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान दिल्लीत दाखल
Air India Boeing 747 Brings Back 324 Indian Nationals From China (Photo Credits: ANI)

चीन (China) मधील वुहान (Wuhan) शहरात झपाट्याने वाढत चाललेल्या कोरोना व्हायरमुळे अतिदक्षता घेण्यात येत आहे. तसेच नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आलेली नाही. याच परिस्थितीत चीन मध्ये काही भारतीय नागरिक अडकून पडले होते. त्यासाठी एअर इंडियाचे (Air India) विशेष विमान चीन मध्ये शुक्रवारी दुपारच्या वेळेस पाठवले होते. त्याचवेळी या सर्व भारतीय नागरिकांचे वैद्यकिय तपासणी करण्यात आली. त्यामुळे विमानाला टेकऑफ करण्यासाठी उशिर झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर आता हेच विमान चीन येथून निघून दिल्लीत दाखल झाले आहे.

दिल्लीत दाखल झालेल्या सर्व भारतीयांसाठी प्रथम विमानतळावर डॉक्टरांच्या एका टीमकडून स्क्रिनिंग ठेवण्यात आले आहे. तसेच गरज पडल्यास या नागरिकांना वैद्यकिय उपचारासाठी निगराणीखाली ठेवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. या सर्व नागरिकांची राहण्याची सोय लष्कराने केली आहे. तसेच हरियाणाच्या मानसेर येथे तात्पुरत्या स्वरुपातील रुग्णालय उभारण्यात आले आहे.(Coronavirus Outbreak: भारतीयांच्या सुटकेसाठी Air India चं विशेष विमान)

ANI Tweet:

चीनमधून भारतामध्ये येणार्‍या प्रवाशांची सध्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर तपासणी केली जात आहे. तसेच आता विशेष विमानाने येणार्‍यांचीदेखील तपासणी केली जाणार आहे. दरम्यान भारताप्रमाणेच कोरोना विषाणूची लागण अमेरिका, युएई, नेपाळ, थायलंड, श्रीलंका, फिनलॅन्ड सह जगातील 20 देशांमध्ये पसरली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडूनदेखील कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे आणीबाणी घोषित केली आहे.