Coronavirus Outbreak: भारतीयांच्या सुटकेसाठी Air India चं विशेष विमान आज होणार 'वुहान'ला रवाना
Air India | Photo Credits: Twitter/ ANI

चीनमध्ये थैमान घालणारा कोरोना व्हायरस आता भारतामध्येही शिरला आहे. दरम्यान केरळमध्ये काही संशयित रूग्णांना रूग्णालयात आयसोलेटेड वॉडमध्ये दाखल करण्यात आले आहेत. आता चीन मधील वुहान शहरामधून भारतीयांच्या सुटकेसाठी एअर इंडियाने खास विमान सज्ज ठेवलं आहे दरम्यान Air India च्या CMD अश्विनी लोहानी यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 400 भारतीयांना चीनमधून बाहेर काढले जाणार आहे. आज (31 जानेवारी) च्या दुपारी एअर इंडियाचे स्पेशल विमान रवाना होणार आहे तर उद्या (1 फेब्रुवारी ) दिवशी रात्री 2 वाजता विमान परत येईल अशी माहिती देण्यात आली आहे. Coronavirus: काळजी घ्या! WHO ने घोषित केली जागतिक आरोग्य आणीबाणी.  

चीनमध्ये वुहान या शहरापासूनच कोरोना वायरसची लागण होण्यास सुरूवात झाली. सर्वाधिक रूग्ण या शहरामध्ये आढळले आहेत. चीन सरकारने सध्या वुहान या शहरात वाहतूक बंद ठेवली आहे. या शहरात जाण्या-येण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान चीनमधील भारतीयांच्या मदतीसाठी खास विमान दिल्लीवरून वुहानला जाणार आहे. अनेक भारतीय विद्यार्थी चीनमध्ये उच्च शिक्षणासाठी जातात. त्यांच्या मदतीसाठी भारत सरकारने हे विशेष पाऊल उचलले आहे. नुकतीच भारतीय आरोग्य मंत्रालयाकडून विशेष अ‍ॅडव्हायजरी देखील जाहीर करण्यात आली आहे. (हेही वाचा, केरळमध्ये Coronavirus चं निदान झालेल्या तरूणीची प्रकृती स्थिर; अजून एक रूग्ण Isolation Ward मध्ये दाखल; आरोग्यमंत्री शैलजा यांची माहिती)

ANI Tweet  

चीनमधून भारतामध्ये येणार्‍या प्रवाशांची सध्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर तपासणी केली जात आहे. तसेच आता विशेष विमानाने येणार्‍यांचीदेखील तपासणी केली जाणार आहे. दरम्यान भारताप्रमाणेच कोरोना विषाणूची लागण अमेरिका, युएई, नेपाळ, थायलंड, श्रीलंका, फिनलॅन्ड सह जगातील 20 देशांमध्ये पसरली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडूनदेखील कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे आणीबाणी घोषित केली आहे.