Coronavirus: सीपीआय (एम) पॉलिटब्युरो सदस्य मोहम्मद सलीम यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह
Mohammed Salim, CPI(M) | (Photo Credits: ANI/File)

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) (Communist Party of India (Marxist)) पॉलेट ब्यूरो सदस्य मोहम्मद सलीम यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. कोरोनाव्हायरसचे निदान झाल्यानंतर मोहम्मद सलीम यांना कोलकाता (Kolkata) येथील ईस्टर्न मेट्रोपॉलिटन बायपास (Eastern Metropolitan Bypass) खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डीएनएने याबाबत वृत्त दिले आहे.

मोहम्मद सलीम हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे दुसरे नेते आहेत ज्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सलीम हे गेल्या काही काळापासून दमा आणि पोटदुखीच्या विकारांनी त्रस्त होते. त्यांना ताप आणि खोकलाही जाणवू लागला. अखेर त्यांची कोरोना व्हायरस चाचणी करण्या आली. जी पॉझिटीव्ह आली.

मोहम्मद सलीम हे 16 व्या लोकसभेमध्ये पश्चिम बंगालमधील रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. 14 व्या लोकसभेवेळीही ते ईशान्य कलकत्ता मतदारसंघातून निवडूण आले होते. 2015 मध्ये त्यांना माकपच्या पॉलेट ब्युरोमध्ये स्थान देण्यात आले. (हेही वाचा, Amit Shah Tested COVID-19 Positive: केंद्रीय गृहमंंत्री अमित शाह यांंना कोरोनाची लागण; मेदांता हॉस्पिटल मध्ये दाखल)

दरम्यान, गृहमंत्री अमित शहा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचीही कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. शहा यांच्यावर सध्या गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर येडियुरप्पा यांना बेंगळुरूच्या मनिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.