Work From Home: लॉकडाऊन काळात वर्क फ्रॉम होम करत 3 पैकी 1 भारतीयाने प्रतिमहिना केली 5000 रुपयांची बचत
Work From Home | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कोरना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊ (Lockdown) काळात अनेक कंपन्या आणि भारतीयांनी घरुन काम करण्याची संकल्पना राबवली. वर्क फ्रॉम होम (Work From Home) नावाने ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर प्रचलित झाली. लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱ्या, रोजगार गेले. अनेकांचे व्यवसाय बुडाले. असे असले तरी काहींची कमाई मात्र चांगली राहिली. एका सर्व्हेनुसार वर्क फ्रॉम होम संकल्पनेनुसार काम करणाऱ्या सरासरी प्रत्येकी 3 पैकी 1 या प्रमाणात अनेक भारतीयांनी प्रतिमहिना 3000 ते 5000 रुपये इतकी बचत केली आहे.

बहुतांश लोकांनी सांगितले की, त्यांनी घर ते कार्यालय याकाळात होणारा प्रवास खर्च, कपडे, खाणे-पिणे तसेच इतर सर्व गोष्टींवर होणारा खर्च मोठ्या प्रमाणवर कमी केला. होमग्रोन फ्लेक्स वर्कप्लेस प्रोवाइडर-ऑफिसने केलेल्या ऑनलाईन सर्व्हेमध्ये 74% लोकांनी सांगितले की ते वर्क फ्रॉम करण्यासाठी तयार आहेत. तर 80 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांचे काम हे वर्क फ्रॉम होम पद्धतीने होण्यासारखे आहे. त्यामुले त्यांना कंपनी, संस्थेने मान्यता दिली तर कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होम करण्यास तयार आहोत.

जून आणि जुलै अशा दोन महिन्यांमध्ये झालेल्या ऑनलाईन सर्व्हेनंतर विविध निष्कर्ष काढण्यात आले. देशभरातील प्रमुख सात मेट्रो शहरांमध्ये तसेच डाइवर्स इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्या 1000 पेक्षाही अधिक कर्मऱ्यांनी या सर्व्हेमध्ये सहभाग घेतला. सर्व्हेमध्ये 47 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना घरुन काम करताना कार्यालयातील बैठकव्यवस्थेची कमी दर्शवली. 71 टक्के लोकांनी म्हटले की, घरातून काम करत असताना जर योग्य जागा आणि थोडी प्रायव्हसी मिळाली तर अधिक चांगल्या प्रकारे काम करता येऊ शकते. (हेही वाचा, Work From Office: कोरोना व्हायरस काळात सुरु झालेल्या Work From Home ला कंटाळले कर्मचारी; आता 82 टक्के लोकांना करायचे आहे ऑफिसमधून काम- JLL Survey)

दरम्यान, जवळपास 60 टक्के कर्मचाऱ्यांनी म्हटले की, नियमीतपणे घरातून कार्यालयात जाण्यासाठी जवळपास एक ते दोन तास इतका वेळ प्रवासात खर्च होत होता. त्यामळे त्या पातळीवर विचार करता वर्क फ्रॉम करताना प्रवासात खर्च होणारा एक ते दोन तासांचा वेळ वाचतो. वर्क फ्रॉम होम काम करताना प्रत्येक वर्षात 44 दिवस अतिरिक्त मिळतात, असेही काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.