Coronavirus: महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवर बडवानी येथे स्थलांतरीत कामगारांचे आंदोलन, प्रचंड गर्दी (Video)
Migrant Workers | (Photo credits: ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus), लॉकडाऊन (Lockdown) आदी कारणांमुळे स्थलांतरीत कामगार (Migrant Workers) आपल्या घराकडे परतत आहेत. अशा स्थिती महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमा (aharashtra-Madhya Pradesh Border) बडवानी (Barwani) येथे स्थलांतरीत मजुरांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली आहे. ही गर्दी इतकी प्रचंड आहे की सेमेवर दोन्ही बाजूला वाहानांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घरी पोहोचण्यासाठी हे मजूर सरकारकडे बसची मागणी करत आहेत. सरकारची दप्तरदीरंगाई पाहून हे कामगार भडकले असून जोरजोरात घोषणाबाजी करत आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बारवानीचे जिल्हाधिकारी अमित तोमर यांनी बसची व्यवस्था करत असल्याचे म्हटल आहे. लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातून हजारो परप्रांतीय आपापल्या राज्यांमध्ये परतत आहेत. त्यासाठी या मजूरांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध रस्त्यांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या मार्गांवर या कामगारांचे तांडेच्या तांडे दिसत आहेत.

दरम्यान, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार स्थलांतरीत कामगारांना महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर रोखण्यात आले. त्यामुळे या मजूरांनी मोठ्या प्रामाणावर आंदोलन सुरु केले. अखेर प्रशासनाने या मजुरांसाठी बसची सुविधा उपलब्ध केली. (हेही वाचा, One Nation One Ration Card: देशभरातील सुमारे 67 कोटी जनता येणार 'वन नेशन - वन राशनकार्ड' कक्षेत)

एएनआय ट्विट

कोरोना व्हायरस संकटाममुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे विविध राज्यांतील अनेक कामगार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहेत. यात महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे.