कोरोना व्हायरस (Coronavirus), लॉकडाऊन (Lockdown) आणि इतर काही कारणांमुळे भारतीय बँकींग सेक्टरला (Indian Banking Sector) भांडवली तुटीचा सामना करावा लागू शकतो. रेटिंग एजन्स फिच ने ही शक्यता बुधवार (1 जुलै) वर्तवली. फिच रेटिंग्ज (Fitch Ratings) ने ही शक्यता वर्तवली आहे. फिचने वर्तवलेल्या शक्यतनेनुसार भारती बँकांना कमीत कमी 15 अब्ज डॉलर इतक्या भांडवली तुटीचा सामना करावा लागू शकतो. या तुटीचा सर्वात मोठा फटका देशातील मध्यमवर्गाला बसण्याची शक्यता आहे.
फिट रेटींग्ज एजन्सीने म्हटले आहे की, जर डेमेस्टीक इकॉनॉमी कोरोना व्हायरस संकटामुळे जर का वेळेत पाय रोऊ शकली नाही तर, भांडवली तूट ही 58 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकते. फिचने पुढे म्हटले आहे की, अशा काळात सरकारी बँकांना पुनर्भांडवलीकरण करण्याची गरज भासू शकते. कारण सरकार बँकांकमध्ये असलेली भांडवली जोखीम ही खासगी बँकांच्या तूलनेत अधिक आह. (हेही वाचा, Petrol Diesel Price and Taxes: पेट्रोल, डिझेलवर कसा लागतो कर आणि वाढते इंधनाची किंमत? घ्या जाणू)
फिचने आपल्या Global economic scenario च्या जून महिन्यातील माहिती अहवालात म्हटले आहे की, भारती अर्थव्यवस्थेत 2022-23 मध्ये 5.5 टक्के दराने वाढ होईल. भारतामध्ये कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करते आहे. मात्र, अद्यापही त्यात यश आले नाही. त्यामुळे त्याचा देशातील अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचेही फिचने म्हटले आहे.