Coronavirus outbreak in India (Photo Credits: IANS)

चीनमधून (China) सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) बघता बघता जगातील अनेक देशांमध्ये शिरकाव केला आणि त्यावर उपययोजना म्हणून अनेक देशांनी लॉक डाऊनची (Lockdown) घोषणा केली. भारतात 23 मार्च पासून लोक घरात आहेत व सध्या तरी हा लॉक डाऊन 3 मे पर्यंत चालेल असे सांगितले गेले आहे. मात्र देशात बाधितांची संख्या पाहता हा लॉक डाऊन वाढण्याची शक्यता आहे. अशात केंद्र सरकारने शुक्रवारी दावा केला आहे की, भारतातील लॉक डाऊन 16 मे  राहिल्यास देशात कोरोना व्हायरसचे कोणतेही नवीन प्रकरण आढळणार नाही.

प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोने (PIB) या बाबतचा एक अहवाल शेअर केला आहे. यामध्ये पीआयबीने लॉकडाउन नसते तर कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या संख्येची सध्याच्या आकड्यांसोबत तुलना केली आहे. आरोग्य विभागाच्या आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये, कोरोना व्हायरस दुप्पट होण्याचा दर कमी करण्यात लॉक डाऊनचा फार मोठा हात असल्याचे सांगितले गेले. यावेळी डॉ. व्हीके पॉल यांनी सांगितले की, जर लॉकडाऊन नसते तर देशात कोरोना व्हायरस प्रकरणांची संख्या 73,000 पेक्षा जास्त झाली असती, मात्र लॉक डाऊनमुळे ती 23,000 च्या आसपास आहे.

पीआयबी ट्विट्स -

शुक्रवारी सरकारी मंत्रालयांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, देशात 23 मार्चपूर्वी कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे दुप्पट होण्याचा कालावधी 3 दिवस होता. त्यानंतर लॉकडाउन लागू केले गेले, ज्याचे परिणाम नंतर दिसू लागले. 29 मार्च रोजी कोरोना बाधितांची संख्या दुप्पट होण्याचा वेळ 5 दिवस झाला. त्यानंतर, आता 6 एप्रिलपासून देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे दुप्पट होण्याचा दर 10 दिवस झाला आहे. अशाप्रकारे लॉक डाऊनचा निर्णय वेळेवर घेण्यात आला होता व ते प्रभावी ठरल्याचे आता दिसून येत आहे. (हेही वाचा: Coronavirus In India: भारतात गेल्या 24 तासांत 1752 कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद; देशात एकूण संक्रमितांची संख्या 23,452)

Plasma Therapy ने कोविड-19 बरा होऊ शकतो का ? काय आहे Plasma Therapy ? - Watch Video 

दरम्यान, गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 1752 रुग्णांची आणि 37 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशा प्रकारे देशातील एकूण संक्रमितांची संख्या 23,452 झाली आहे. सध्या देशातील रिकव्हरी रेट हा 20.57 टक्के इतका आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या 28 दिवसांत 15 जिल्ह्यांमध्ये कोणतेही नवीन प्रकरण समोर आले नाही. आतापर्यंत देशात असे 80 जिल्हे आहेत, जिथे गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा कोणताही नवीन रुग्ण आढळला नाही.