कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील सध्याच्या स्थितीची माहिती देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली यामध्ये आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 1752 रुग्णांची आणि 37 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशा प्रकारे देशातील एकूण संक्रमितांची संख्या 23,452 झाली आहे. सध्या देशातील रिकव्हरी रेट हा 20.57 टक्के इतका आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या 28 दिवसांत 15 जिल्ह्यांमध्ये कोणतेही नवीन प्रकरण समोर आले नाही. आतापर्यंत देशात असे 80 जिल्हे आहेत, जिथे गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा कोणताही नवीन रुग्ण आढळला नाही.
एएनआय ट्विट -
1752 new #COVID19 cases & 37 deaths reported in the last 24 hours. Total number of cases rises to 23,452, including 17915 active cases, 4813 cured & 724 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/nX6m1yRjY9
— ANI (@ANI) April 24, 2020
सध्या सध्या सुमारे 9.45 लाख लोक देखरेखीखाली आहेत, लक्षणे आढळल्यावर या लोकांचे तातडीने नमुने गोळा करण्यात येत आहेत. लॉक डाऊनमुळे भारतातील परिस्थिती मोठ्या प्रमाणात आटोक्यात आल्याचे मत आरोग्य विभागाने व्यक्त केले आहे. लॉक डाऊनमुळे सध्या देशात जवळजवळ 23 हजार रुग्ण आहेत, लॉक डाऊनन नसते तर देशातील कोरोना बाधितांची संख्या 73 हजारावर पोहचली असती. सध्या देशात 4813 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत व 724 लोकांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 6427 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाचे 778 रुग्ण नोंदवले गेले आणि 14 लोकांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर मुंबईबद्दल बोलायचे झाल्यास, शहरात 4205 संक्रमित रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत मुंबईत 522 नवीन रुग्ण आढळले आणि या कालावधीत 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरस लॉक डाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी 6 महिन्यांच्या बाळावर दाखल केला FIR)
COVID -19: नवजात बाळाची आणि आईची व्हिडिओकॉल वर घडून आणली अनोखी भेट - Watch Video
अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वाधिक झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत अमेरिकेत मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. आकडेवारीनुसार, अमेरिकेत एका दिवसात 3,176 लोक मरण पावले आहेत. कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळपर्यंत जगभरात एकूण 26,27,630 कोरोना प्रकरणांची नोंद झाली असून, त्यात 1,83,336 मृत्यू आहेत.