देशभरातील कोरोना व्हायरस (Coronavirus ) संक्रमितांची संख्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. संपूर्ण देशभरात कोरोना संक्रमित असलेल्या नव्या रुग्णांची संख्या 18,000 पेक्षा अधिक आहे. या नव्या आकडेवारीसह देशातील एकूण संक्रमितांची (Coronavirus in India) आतापर्यंतची संख्या 1,12,10,799 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रिविवारी (7 मार्च 2021) असे सांगितले की, उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या गेल्या पाच दिवसांमध्ये अधिक वाढू लागली आहे. देशात सध्यास्थितीत 1,84,523 जणांवर कोरोना उपचार सुरु आहेत. ही संख्या एकूण संक्रमितांच्या 1.65% इतकी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, संक्रमित झालेल्या लोकांचे बरे होण्याचे प्रमाण 96.95 इतके झाले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी 8 वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार देशात पाठिमागील 24 तासात 18,711 जणांना कोरोना व्हायरस संक्रमण झाले. तर 100 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण मृतांची संख्या 1,57,756 इतकी झाली आहे. या आधी 29 जानेवारीला कोरोना संक्रमितांची संख्या 18,855 इतकी झाली होती. देशात आतापर्यंत कोरोना संक्रमित झालेल्यांची संख्या 1,08,68,520 इतकी आहे. म्हणजेच देशातील कोरोना संक्रमितांचे बरे होण्याचे प्रमाण 96.95% इतके आहे. तर मृत्यूदर हा 1.41% इतका आहे. (हेही वाचा, Coronavirus: दिल्ली, महाराष्ट्र, पंजाबसह 'या' राज्यात कोरोनाचे 84.44 टक्के नवे रुग्ण आढळल्याची सरकारची माहिती)
देशात गेल्या वर्षीच्या 7 ऑगस्टला कोरोना संक्रमितांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्टला 30 लाख आणि पाच सप्टेंबरला 40 लाखांपेक्षा अधिक होती. कोरोना संक्रमणाची एकूण प्रकरणे 16 सप्टेंबर 50 लाख, 28 सप्टेंबर 60 लाख, 11 ऑक्टोबर 70 लाख, 29 ऑक्टोबर 80 लाख, 20 नोव्हेंबरला 90 लाख आणि 19 डिसेंबरला एक कोटींच्याही वर गेले होते.
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आईसीएमआर) ने दिलेल्या माहितीनुसार, 6 मार्च पर्यंत देशात 22,14,30,507 नमुने कोरोना संशोधनासाठी गोळा करण्यात आले. त्यातील 7,37,830 नमुने शनिवारी तपासण्यात आले.