Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

Coronavirus:  देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा वेगाने वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासह मास्क घाला अशी सुचना वारंवार सरकारकडून केली जात आहे.  अशातच आता देशातील दिल्ली, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, गुजरात आणि मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तसेच गेल्या 24 तासात 84.44 टक्के नवे कोरोनाचे रुग्ण या सहा राज्यात आढळून आल्याची माहिती भारत सरकार कडून दिली गेली आहे.

कोरोनावरील लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला नुकतीच सुरुवात झाली असून नागरिकांकडून सुद्धा त्याला उत्तम प्रतिसाद दिला जात आहे. तर गेल्या 24 तासात देशात 13.8 लाखांहून अधिक जणांनी कोरोनाच्या लसीचा डोस घेतल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून दिली गेली आहे. त्याचसोबत अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम,चंदीगढ, दादरा नगर हवेली, गुजरात,हरियाणा, हिमाचल प्रदेष, लद्दाखसह अन्या काही राज्यांत कोरोनामुळे गेल्या 24 तासा रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.(COVID-19 Vaccine: ब्रिटेनला Serum Institute of India ने बनविलेल्या AstraZeneca लसीचे 1 कोटी डोस मिळणार)

Tweet:

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे आणखी 16,838 रुग्ण आढळून आले असून 13,819 जणांना डिस्चार्ज दिला गेला आहे. तसेच 113 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून दिली गेली आहे. त्यामुळे देशात आता सध्या कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 1,11,73,761 वर पोहचली असून 1,08,39,894 जणांना डिस्चार्ज दिला गेला आहे. तसेच एकूण 1,57,548 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर 1,16,319 ऐवढे कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण असून 1,80,05,503 जणांचे लसीकरण झाले आहे.