COVID-19 (Photo Credits: IANS)

भारतात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे देशात 17 मे ठेवण्यात आलेला लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सद्य स्थितीत भारतात 85,940 रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात गेल्या 24 तासांत 3970 रुग्ण आढळले असून एकूण 103 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) सांगण्यात येत आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक असून ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

भारतात सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण महाराष्ट्र असून येथील रुग्णांची एकूण संख्या 29,100 इतकी झाली आहे. त्यापाठोपाठ कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण तमिळनाडू मध्ये आढळून आले आहेत. तमिळनाडूत सद्य स्थितीत 10,108 कोविडचे रुग्ण आढळून आले आहेत. COVID-19 Pandemic मध्ये झोमॅटो कंपनीचा मदतीसाठी पुढाकार; भारतातील 3,100 हून रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांना तब्बल 2.64 कोटी रुपयांची मदत

पाहूया कोविड-19 रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी

S. No. Name of State / UT Total Confirmed cases* Cured/Discharged/Migrated Deaths**
1 Andaman and Nicobar Islands 33 33 0
2 Andhra Pradesh 2307 1252 48
3 Arunachal Pradesh 1 1 0
4 Assam 90 41 2
5 Bihar 1018 438 7
6 Chandigarh 191 37 3
7 Chhattisgarh 66 56 0
8 Dadar Nagar Haveli 1 0 0
9 Delhi 8895 3518 123
10 Goa 15 7 0
11 Gujarat 9931 4035 606
12 Haryana 818 439 11
13 Himachal Pradesh 76 39 3
14 Jammu and Kashmir 1013 513 11
15 Jharkhand 203 87 3
16 Karnataka 1056 480 36
17 Kerala 576 492 4
18 Ladakh 43 22 0
19 Madhya Pradesh 4595 2283 239
20 Maharashtra 29100 6564 1068
21 Manipur 3 2 0
22 Meghalaya 13 11 1
23 Mizoram 1 1 0
24 Odisha 672 166 3
25 Puducherry 13 9 1
26 Punjab 1935 305 32
27 Rajasthan 4727 2677 125
28 Tamil Nadu 10108 2599 71
29 Telengana 1454 959 34
30 Tripura 156 42 0
31 Uttarakhand 82 51 1
32 Uttar Pradesh 4057 2165 95
33 West Bengal 2461 829 225
Cases being reassigned to states 230
Total number of confirmed cases in India 85940# 30153 2752
*(Including foreign Nationals)
**( more than 70% cases due to comorbidities )
#States wise distribution is subject to further verification and reconciliation
#Our figures are being reconciled with ICMR

कोरोना व्हायरस संकटात देशाला उभारी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची (Atma Nirbhar Bharat Abhiyan) घोषणा केली. यासाठी मोदींनी 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. 20 लाख कोटी या मोठ्या रक्कमेचा वापर कसा करणार याची तपशीलवार माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) गेल्या 3 दिवसांपासून देत आहेत. त्यात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या असून आजही नव्या तरतूदींची माहिती देणार आहेत. यासाठी आज पुन्हा एकदा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 4 वाजता अर्थमंत्री पत्रकारांशी संवाद साधतील.