Coronavirus In India Updates: भारतात गेल्या 24 तासात आणखी 97,570 रुग्णांची वाढ तर 1201 जणांचा बळी; देशातील COVID19 चा आकडा 46 लाखांच्या पार
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

जगभरासह देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. तर देशात गेल्या 24 तासात आणखी 97,570 रुग्णांची भर पडली असून 1201 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 46 लाखांच्या पार गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 9,58,316 अॅक्टिव्ह रुग्ण संख्या असून 36,24,197 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एकूण 77,471 जणांचा बळी गेला आहे. देशात 46,59,985 वर कोरोनाबाधितांचा आकडा आता देशात झाला आहे.(Coronavirus In India Updates: भारतात गेल्या 29 दिवसात 100% पेक्षा अधिक कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारली असून डिस्चार्ज दिल्याची आरोग्य मंत्रालयाची माहिती)

कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच कोविड योद्धे सुद्धा सध्याच्या कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांवर अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. दुसऱ्या बाजूला कोरोनावर अद्याप ठोस लस उपलब्द नसल्याने त्याच्या संदर्भात जगभरातील संधोधक अभ्यास करत आहेत.(RT-PCR Testing Mandatory: रॅपिड अँटीजन टेस्ट निगेटीव्ह आलेल्या Symptomatic रुग्णांची RT-PCR चाचणी करणे अनिवार्य- केंद्रीय आरोग्य मंत्रालय)

दरम्यान, सीरम इंस्टीट्युटने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या कोविशिल्ड लसीची मानवी चाचणी भारतातही थांबवली आहे. या लसीच्या चाचण्या 17 वेगवेगळ्या ठिकाणी चालू होत्या. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या पुढच्या आदेशापर्यंत या चाचण्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. अशी माहिती सीरम इंस्टीट्युटकडून देण्यात आली आहे. तर आम्ही परिस्थितीची पाहणी करत आहोत. AstraZeneca जोपर्यंत ट्रायल्स सुरु करत नाहीत तोपर्यंत भारतातील लसीची मा्नवी चाचणी थांबवण्यात आल्याचे सीरम इंस्टीट्युट यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.