Coronavirus In India: भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 42,533 वर पोहचला, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांची माहिती
Coronavirus In Maharashtra (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे येत्या 17 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी नाही आहे. तरीही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता देशात कोरोनाबाधितांचा आकाड 42,533 वर पोहचला आहे. त्यापैकी 29,453 अॅक्टिव्ह रुग्ण आणि 11,707 जणांची प्रकृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे 1373 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तरीही नागरिकांना सुद्धा लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहेत.

भारताची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी काही गोष्टी अंशत: सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र त्यावेळी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करण्याची सुचना देण्यात आली आहे. केंद्र सरकारने नवी मार्गदर्शक सुचना नियमावली जाहीर केली आहे. तर भारतात गेल्या 24 तासात 2533 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 72 जणांचा मृत्यू झाला आहे.(Lockdown: काँग्रेस उचलणार 'श्रमिक स्पेशल ट्रेन'ने घरी परतणाऱ्या कामगार, श्रमिकांच्या रेल्वे तिकीटांच्या खर्चाचा भार)

दरम्यान, देशभरात विविध ठिकाणी लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात मजूर आणि कामगार वर्ग अडकून पडला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने यांच्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु करण्यात आली आहे. मात्र यावेळी कामगारांची वैद्यकिय तपासणी आणि रजिस्ट्रेशन करुन आपल्या घरी पाठवले जात आहेत. तसेच रविवारी कोविड वॉरियर्सला भारताच्या सैन्य, नौदल आणि वायू दलाकडून मानवंदना देत त्यांच्यावर पुष्पवृष्टी केल्याचे दिसून आले.