Coronavirus in India | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) चे भारतातील संक्रमण दिवसागणिक वाढत आहे. मागील 24 तासात 9987 नव्या रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,66,598 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 331 नवे रुग्ण दगावले असून देशात मृतांची एकूण संख्या 7466 वर पोहोचली आहे. सद्य घडीला देशात एकूण 1,29,917 रुग्णांवर उपचार सुरु असून 1,29,215 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry of India) सांगण्यात आहे. देशात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण हे महाराष्ट्रात असून राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे 2,553 रुग्णांची भर पडली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना रुग्णांची एकूण संख्या 88,528 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ तामिळनाडू, गुजरात, दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. भारतातील प्रत्येक राज्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील तक्ता तपासून पहा.

हे ही वाचा - देशभरात सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करत मंदिर, मशीद, चर्च आणि गुरुद्वारा येथे नागरिकांनी केली प्रार्थना- पहा फोटो आणि व्हिडिओ

देशातील कोणत्या राज्यात कोरोनाचे किती रुग्ण?

 

राज्य संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
महाराष्ट्र 43601 3060 39314
दिल्ली 17125 812 10999
तामिळनाडु 14399 269 16999
गुजरात 5186 1249 13635
पश्चिम बंगाल 4488 396 3303
उत्तर प्रदेश 4076 275 6185
कर्नाटक 3259 61 2132
जम्मु आणि काश्मीर 2830 41 1216
राजस्थान 2718 240 7641
मध्य प्रदेश 2658 412 6331
बिहार 2578 30 2480
हरियाणा 2286 28 2134
आंध्र प्रदेश 1951 75 2682
आसाम 1946 4 615
तेलंगणा 1803 137 1710
केरळ 1096 15 803
ओडिशा 953 9 1894
उत्तराखंड 814 13 528
छत्तीसगढ 786 4 283
त्रिपुरा 608 0 192
झारखंड 602 7 490
पंजाब 451 51 2106
गोवा 235 0 65
हिमाचल प्रदेश 184 5 224
मणिपुर 120 0 52
नागालॅंड 110 0 8
पुद्दूचेरी 63 0 36
लडाख 52 1 50
अरुणाचल प्रदेश 50 0 1
चंदिगढ 36 5 273
मिझोराम 33 0 1
मेघालय 22 1 13
दादरा नगर हवेली 18 0 2
सिक्कीम 7 0 0
अंदमान आणि निकोबार बेटे 0 0 33
एकुण 124981 7200 124429

दरम्यान, एकीकडे देशातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढत असताना केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. अनेक राज्यात धार्मिक स्थळे सुरु करण्यात आली असून काल पासून खासगी कार्यालयांमध्ये 10% कर्मचारी उपस्थिती सोबत कामे सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच राज्यातील दुकाने, उद्योग व्यवसाय हळूहळू सुरु होत आहेत.

नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग चे नियम पालन करणे सर्वात जास्त महत्वाचे आहे, कोरोना संपलेला नाही मात्र आपण थांबून चालणार नाही म्हणून लॉक डाउन शिथिल होत आहे हे लक्षात ठेवा असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.