Coronavirus In India: भारतात एकाच दिवसात 70 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांची प्रकृती सुधारत असल्याची आरोग्य मंत्रालयाची माहिती
Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

Coronavirus In India: जगभरासह भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 46 लाखांच्या पार गेल्याचे दिसून आले आहे. याच पार्श्वभुमीवर आता आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात एक रिपोर्ट जाहीर केला आहे. या रिपोर्टनुसार, कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारण्याचा वेग हा सर्वाधिक असून मे महिन्यात जवळजवळ 50 हजार जण बरे झाल्याचे दिसून आले होते. तर सप्टेंबर महिन्याच हिच आकडेवारी 36 लाखांहून अधिक आहे. याचसोबत अॅक्टिव्ह रुग्णांच्या 3.8 पटीने कोरोनाग्रस्तांची प्रकृती सुधारत असल्याचे ही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.(Bharat Biotech Covaxin Update: भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन'ची प्राण्यांवर यशस्वी चाचणी; माकडांमध्ये Coronavirus च्या Antibodies केल्या विकसित)

कोरोनासंक्रमितांसह त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून काढून त्यांची चाचणी करणे, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासह उत्तम आरोग्य सुविधा देण्याकडे सरकारचे अधिक लक्ष घालत आहे. जगभरातील कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहिली असता देशात ती काहीशा प्रमाणात नियंत्रणात असल्याचे ही यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे.(Coronavirus Recovery Rate In India: गेल्या 24 तासात देशात 81,533 जणांची कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचा दर 77.77 टक्क्यांवर)

दरम्यान, कोरोनावर अद्याप ठोस लस उपलब्ध नाही आहे. परंतु आता भारताच्या कोविड 19 वरील संभाव्य लस Covaxin चे Animal Trials अहवाल सकारात्मक आल्याची माहिती भारत बायोटेक यांनी माहिती दिली आहे. भारतामध्ये ICMR सोबत Bharat Biotech आणि NIV यांच्या संयुक्त प्रयत्नाने बनवण्यासाठी काम सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये नागपूर मध्ये त्याचे काही डोस देण्यात आले आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान दिल्ली आणि पटना, विशाखापट्टनम मध्ये किंग जॉर्ज अस्पताल, हैदराबाद मध्ये निज़ाम च्या आयुर्विज्ञान संस्थानमध्ये लसीची मानवी चाचणी होत आहे. तर यासोबत रोहतक मध्ये पीजीआई मध्येदेखील ट्रायल्स सुरू आहेत.