Coronavirus Recovery Rate In India: देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात 81,533 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णांलयातून डिस्चार्ज देण्यात आला. भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणामध्ये देशातील 5 राज्य आघाडीवर आहेत. यात महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील रुग्णांचा समावेश आहे. देशातील एकूण रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणामध्ये वरील पाच राज्यातील 60 टक्के रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत देशात 3,624,196 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 77.77 टक्क्यांवर पोहोचला आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. तसेच गेल्या 24 तासात 1,201 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 36 टक्के मृत्यू हे महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
Highest single-day recoveries of 81,533 registered in last 24 hrs. 60% of total recovered cases reported from 5 states-Maharashtra, Tamil Nadu, Andhra Pradesh, Karnataka & UP. Total recoveries have crossed 36 lakhs (3,624,196) taking the Recovery Rate to77.77%: Ministry of Health pic.twitter.com/hV5a0nyq5g
— ANI (@ANI) September 12, 2020
97,570 cases added in the last 24 hours in the country. Maharashtra has over 24,000 new cases. Andhra Pradesh & Karnataka both have contributed over 9,000.
60% of total cases reported from 5 states. These states also reported maximum recoveries in past 24 hrs: Ministry of Health pic.twitter.com/4O6gyW6BYC
— ANI (@ANI) September 12, 2020
याशिवाय देशात गेल्या 24 तासात 97,570 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यात महाराष्ट्रातील 24,000 रुग्णांचा समावेश आहे. यात आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील 9 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांचा समावेश आहे. नवीन बरे झालेल्या रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमधून नोंदवले गेले आहेत.