भारतात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट कायम असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मागील 24 तासांतही कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. 20,903 नवे रुग्ण आढळले असून 379 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या वाढीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 6,25,544 वर पोहचला आहे. त्यापैकी 2,27,439 अॅक्टीव्ह केसेस आहेत. म्हणजेच या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 3,79,892 रुग्णांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. दरम्यान कोविड-19 ची बाधा झाल्यामुळे एकूण 18213 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे.
देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सुरक्षित राहण्यासाठी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे अशा सूचना वारंवार सरकार आणि आरोग्य यंत्रणांकडून करण्यात येत आहेत. दरम्यान देशात अनलॉक 2 ला सुरुवात झाली असून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. (महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार; राज्यात दिवसभरात 6 हजार 330 नव्या रुग्णांची नोंद, 125 मृत्यू)
ANI Tweet:
India reports 379 deaths and highest single-day spike of 20,903 new #COVID19 cases in the last 24 hours. Positive cases stand at 6,25,544 including 2,27,439 active cases, 3,79,892 cured/discharged/migrated & 18213 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/tFL7lwp11i
— ANI (@ANI) July 3, 2020
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कोरोना व्हायरस संकटाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे राज्य सरकारवर जबाबदारी अधिक आहे. दरम्यान मुंबईमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून काही नवे नियम नागरिकांच्या सुरक्षेसाठी लागू करण्यात आले आहेत. तर मुंबई नजीकच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे.