Coronavirus: राज्यसभेच्या सर्व सदस्यांनी एक महिन्याचा पगार PM Cares Funds मध्ये देण्याचे सभापती एम. वेंकैया नायडू यांचे आवाहन
Venkaiah Naidu (Photo Credits-Twitter)

देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी विविध स्तरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. तर देशातील बड्या उद्योगपती ते सामान्य व्यक्ती पर्यंत प्रत्येक जण त्यांच्या परीने गोरगरिबांसह कोरोनाच्या रुग्णांना मदत करत आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्यसभेचे  सभापती एम. वेंकैया यांनी राज्यसभेच्या सर्व सदस्यांना त्यांचा एक महिन्याचा पगार 'पीएम केअर्स फंड्स' (PM Cares Funds) मध्ये दान देण्याचे आवाहन केले आहे. सदस्यांनी कमीत कमी 1 कोटी रुपयांची मदत करावी असे अपील केले आहे. या संदर्भात राज्यसभेच्या सभापती एम. वेंकैया नायडू यांनी खासदारांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रानुसार, कोविड-19 संक्रमणाशी सामना करण्यासाठी सरकार खासगी क्षेत्र आणि नागरिकांना आर्थिक मदत करण्यातचे आवाहन करत आहे.

एम. वेकैंया यांनी राज्यसभेच्या सदस्यांना असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या महासंकटावेळी राबवण्यात येणाऱ्या अभियानात आपला हातभार लावणे महत्वाचे आहे. त्यामुळे खासदारांनी 2020-21 या वर्षासाठी त्यांच्या खासदार निधीतून कमीत कमी 1 कोटी रुपयांचे दान पीएम केअर्स फंड्स मध्ये द्यावे असे सांगितले आहे. तसेच केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीशी संबंधित नियमांमध्ये आवश्यक त्या तरतुदी केल्या असल्याचे वेकैंया यांनी म्हटले आहे.(Coronavirus Lock Down काळात मजुरांकडून घरभाडे घेऊ नका, घर खाली करायला लावू नका; केंद्रीय गृहमंत्रालयाचे जमीन मालकांना आदेश)

उपाध्यक्षांनी खासदारांसह नागरिक, स्वयंसेवी संस्थांना गोरगरिबांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. तसेच या लोकांसाठी भोजन, जेवणाची सोय किंवा अन्य मदतीसाठी हातभार लावावा असे ही वेंकैया यांनी सांगितले आहे. दकम्यान, राज्यसभेच्या उपाध्यक्षांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि दोन सदनांच्या महासचिवांसह या विषयावर चर्चा करत बैठक बोलावली होती.