कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन (Lock Down) नंतर हातावर पोट असणाऱ्या मजूर वर्गाला मोठा फटका बसला आहे, काम बंद झाल्यामुळे रोजगाराचे सर्व पर्याय बंद झाले आहेत, त्यामुळे रोजच्या खाण्यापासून ते कुठे राहायचे इथवर प्रश्न समोर उभे ठाकले आहेत, परिणामी यातील अनेक मजूर हे आपल्या मूळ गावी परतण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना गावी जाण्यासाठी ट्रेन सुद्धा उपलब्ध नसल्याने सर्व बाजूंनी पंचाईत झाली आहे. अशावेळी काही सामाजिक संस्था तसेच सरकारच्या वतीने या मजुरांना व त्यांच्या कुटुंबियांना दोन वेळचे अन्न पुरवण्याची सोय अगोदरच करण्यात आली होती, त्यासोबतच आता त्यांच्या राहण्याचा प्रश्नही सरकारने सोडवला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने (Ministry Of Home Affairs) जारी केलेल्या सूचनेनुसार, जे मजूर भाड्याच्या घरात राहतात त्यांच्या संबंधित घरमालकांनी पुढील एका महिन्याचे घरभाडे घेऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत तसेच कोणत्याही मजुराला घर खाली करण्यास काही दिवस सांगू नये असेही गृहमंत्रालयाने सांगितले आहे.(हेही वाचा - Coronavirus in Maharashtra: राज्यात कोरोना ग्रस्तांचा आकडा 196 वर, जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर सह अन्य जिल्ह्यांतील रुग्णांची संख्या)
प्राप्त माहितीनुसार, केंद्र सरकारने सर्व राज्य व केंद्र शासित प्रदेशांना आपल्या सीमा बंद करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे परराज्यातून आलेले अनेक नागरिक आहे त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. यामध्ये सर्वात जास्त नागरिक हे रोजगारी मजूर आहेत. त्यांना यावेळी निदान राहण्याची आणि खाण्याची सोया व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयानंतर जमीन मालकांना एक महिन्याचे नुकसान होईल त्याचे काय असेही सवाल सामान्य नागरिकांकडून केले जात आहेत.
पीटीआय ट्विट
Landlords cannot ask for rent for lockdown period from workers living in rented accommodation, cannot ask them to vacate: MHA
— Press Trust of India (@PTI_News) March 29, 2020
दरम्यान, देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. आज घडीला समोर आलेल्या आकडेवारीनुसार सध्या देशात 979 कोरोना रुग्ण आहेत, आतापर्यंत 25 जणांचा या कोरोनामुळे बळी गेला आहे. मागील 24 तासात तब्बल 106 नवे रुग्ण आढळलायने हा आकडा वेगाने वाढत आहे.