Coronavirus: कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी अदनानी फाउंडेशनकडून 100 कोटींचे PM Cares Fund साठी दान
Gautam Adani, Chairman, Adani Group (Photo Credits-ANI)

देशातील कोरोना व्हायरसचे (Coronavirus) महासंकट दूर पळवण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केले जात आहेत. तसेच कोरोनाबाधित रुग्णांसह देशातील गोरगरिबांचे लॉकडाउनच्या काळात हाल होत असल्याने त्यांच्यासाठी मदतीचे हात पुढे येत आहेत. तर रिलायन्स, टाटा ट्रस्ट या सारख्या बड्या उद्योगपतींकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आर्थिक मदत करत आहेत. तर आता अदनानी फाउंडेशन यांच्याकडून ही कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी 100 कोटींची मदत जाहीर केली आहे. अदनानी फाउंडेशनची (Adani Foundation) ही आर्थिक मदत 'पीएम केअर्स फंड्स' (PM Cares Fund) मध्ये जमा करण्यात आली आहे.

अदनानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदनानी यांनी कोरोनाच्या विरोधात त्यांच्याकडून कोट्यावधींची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यानुसार त्यांनी 100 कोटी रुपये पीएम केअर्स फंड आणि अन्य सुविधेसंबंधित सुद्धा सरकारला आणि नागरिकांना अदनानी फाउंडेशन मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांनी आर्थिक मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी पीएम केअर्स फंड्स येथे पैसे दान करण्यासाठी बँक संबंधित माहिती सुद्धा जाहिर केली आहे. त्यानुसार आता या अभियानाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने मोदी यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत.(कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात मदत म्हणून कोटक महिंद्रा बँकेकडून 50 कोटी रुपयांचे योगदान) 

तसेच टाटा ट्र्स्टकडून (Tata Trusts) कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. टाटा ग्रुपचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांनी याबाबत माहिती दिली असून अत्यावश्यक सेवासुविधांचा पुरवठा लवकरात लवकर करण्यात यावा असे ही त्यांनी म्हटले आहे. गेल्याच याआधी मेदांता ग्रुपचे अनिल अग्रवाल यांनी 100 कोटी रुपयांचा निधी मदतीसाठी दिला होता. महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी सुद्धा त्यांची एक महिन्याचा पगार देणार असल्याचे स्पष्ट केले होते.