Kotak Mahindra Bank (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) गंभीर संकटावर मात करण्यासाठी PM CARES फंडात अनेकजण निधी जमा करत आहेत. यातच आता कोटक महिंद्रा बँकेने (Kotak Mahindra Bank) देखील पुढे येत मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. PM CARES फंडात कोटक बँकेकडून आणि बँकेचे डिरेक्टर उदय कोटक (Uday Kotak) यांच्याकडून तब्बल 50 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. यापैकी 25 कोटी रुपये कोटक बँकेकडून देण्यात येणार असून उर्वरीत 25 कोटी रुपये स्वतः उदय कोटक देणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत PM CARES फंडात पैसे जमा करण्याचे आवाहन केले होते. अगदी लहान देगणी देखील यात स्वीकारली जाईल. यामुळे संकटाशी सामना करण्याची क्षमता वाढेल आणि नागरिकांची सुरक्षितता जपली जाण्यास मदत होईल असेही त्यात म्हटले होते. मोदींच्या या आवाहनानंतर अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहेत.

ANI Tweet:

यापूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासह 3 लाख रेल्वे कर्मचारी आपला महिन्याभराचा पगार PM CARES फंडात जमा करणार असल्याचे सांगितले. तसंच BCCI ने PM CARES फंडात 51 कोटींचे दान दिले होते. अभिनेता अक्षय कुमार याने देखील 25 कोटी रुपये मदत म्हणून PM CARES फंडात दिले आहेत. इतंकच नाही तर टाटा ट्र्स्टकडून 500 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.