राजस्थानमधील काँग्रेस आमदार भरत सिंह कुंदनपूर (Bharat Singh Kundanpur) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी 500 आणि 2,000 रुपयांच्या चलनी नोटांवरुन महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची प्रतिमा हटवावी अशी मागणी केली आहे. ही मागणी करत असताना त्यांनी महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेल्या नोटा (Indian Currency) भ्रष्टाचारासाठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे बापूंची प्रतिमा (महात्मा गांधी) मलिन होते आहे, असे कारण दिले आहे. राजस्थानमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांकडे लक्ष्य वेधत राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने म्हटले आहे की, जानेवारी 2019 ते 31 सप्टेंबर डिसेंबर 2020 पर्यंत भ्रष्टाचाराची 616 प्रकरणे दाखल झाली. म्हणजेच प्रतिदिन सरासरी भ्रष्टाचाराची दोन प्रकरणे दाखल करण्यात आल्याचे म्हटले.
महात्मा गांधी यांच्या 152 व्या जन्मदिनानिमित्त दोन ऑक्टोबरला काँग्रेस आमदार भरत सिंह कुंदनपूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी चलनी नोटांवरुन महात्मा गांधी यांची प्रतिमा हटविण्याची मागणी केली.भरत सिंह कुंदनपूर हे राजस्थानमधील सांगोड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर प्रतिनिधित्व करतात. त्यांनी म्हटले आहे की, केवळ 10, 20, 50, 100 आणि 200 रुपये अशा पाच चलनी नोटांवरच महात्मा गांधी यांची प्रतिमा छापावी. कारण देशातील गरीब जनता केवळ त्याच नोटांचा वापर करते. महात्मा गांधी यांनी आयुष्यभर केवळ वंचित आणि दीन दुबळ्यांसाठीच काम केले. (हेही वाचा, 2000 च्या नोटांची छपाई झाली बंद; जाणून घ्या त्या मागची कारणं)
भरत सिंह कुंदनपूर यांनी पत्रा पुढे म्हटले आहे की, 'माझा सल्ला आहे की, 500 आणि 2,000 रुपयांच्या नोटांवर केवळ महात्मा गांधी यांच्या चष्माची प्रतिमा ठेवावी. तसेच, या जागी अशोक चक्राचाही वापर करता येऊ शकतो.' याच पत्रात भरत सिंह कुंदनपूर पुढे लिहितात, पाठिमागील सात दशकांमध्ये देशात भ्रष्टाचार पुरेपूर पसरला आहे. महात्मा गांधी हे एक सत्याचे प्रतिक आहेत. त्यामुळे
महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेल्या 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा जर भ्रष्टाचारासाठी वापर केला जात असेल तर तो महात्मा गांधी यांचा अपमान आहे.