Congress | (Photo Credits: Facebook)

इंडियन नॅशनल काँग्रेस (Indian National Congress) पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमाने मैदानात उतरु पाहतो आहे. त्यासाठी पक्ष सदस्यत्व मोहीम राबवतो आहे. पक्षाने पक्ष सदस्यत्व स्वीकारणाऱ्यांसाठी नवी अट ठेवली आहे. पक्षाने म्हटले आहे की, काँग्रेस (Congress) सदस्यत्व स्वीकारण्यासाठी दारु (Alcohol) आणि मादक पदार्थांचे सेवन करण्यापासून स्वत:ला दूर ठेवावे लागेल. खादी (Khadi) परीधान करावी लागेल. तसेच, पक्षाचे धोरण आणि नेतृत्व यांच्यावर जाहीरपणे टीका करता येणार नाही असेही प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. काँग्रेस सदस्यत्व (Congress Membership) पत्रात याबात उल्लेख आहे. या पत्रानुसार, काँग्रेसच्या सदस्याला जाहीर करावे लागेल की, ते कायदेशीर मर्यादेपेक्षा अधिक संपत्ती बाळगणार नाहीत. बेकायदेशीररित्या संपत्ती जमवणार नाहीत. काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे आणि कार्यक्रम पुढे राबविण्यासाठी शारीरिक कष्ट आणि तळागाळात जाऊन काम करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.

काँग्रेस पक्षाची एक नोव्हेंबर पासून सदस्यत्व मोहीम सुरु होत आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या अर्जात 10 मुद्द्यांचा समावेश आहे. ज्यासंदर्भात सदस्याला स्वत: त्याबाबत मान्यता द्यावी लागेल. 16 ऑक्टोबरला झालेल्या काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. पक्ष संघटठनात्मक निवडणुकीपूर्वी पक्ष एक नोव्हेंबर ते पुढच्या वर्षीच्या 31 मार्च पर्यंत ही सदस्यत्व मोहीम कायम ठेवेल. (हेही वाचा, Covid-19 Vaccination In India: काँग्रेसचा पीएम नरेंद्र मोदींवर हल्ला- 'पंतप्रधानांनी जनतेला चुकीची माहिती दिली, माफी मागावी')

काँग्रेसच्या सदस्यत्व पत्रात असेही म्हटले आहे की, नव्या सदस्यांना संकल्प करावा लागेल क, ते कोणत्याही प्रकारे सामाजिक भेदवाव अथवा तत्सम कृतींमध्ये सहभागी होणार नाहीत. ज्या गोष्टी समाज, देश याला धक्का पोहोचवतील अशा गोष्टींमध्ये सहभागी होणार नाहीत. या शपथपत्रात पुढे असेही म्हटले आहे की, 'मी नियमीतपणे खादी परिधान करेन. दारु आणि मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहीन. मी समाजिक भेदभाव आणि असमानता करणारन नाही. पक्षाने दिलेले प्रत्येक काम निष्ठेने पूर्ण करेन.'