नव्या वर्षात (New Year 2022) ऑनलाईन फूड डिलिव्हरी, एटीएम ट्रांजेक्शन्स यांसारख्या गोष्टी महागल्या असल्या तरी इंडियन ऑईल कंपनीने मात्र नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी काहीसा दिलासा दिला आहे. नव्या वर्षात पदार्पण करताच कमर्शिअल एलपीजी सिलींडर (Commercial LPG Cylinder Price) दरात कपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. ही कपात 19 किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरवर करण्यात आली आहे.
IOCL ने दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2022 ला दिल्ली येथे कमर्शिअल गॅसची किंमत 102 रुपयांनी घटलून ती 1998.5 रुपये झाली आहे. 31 डिसेंबर पर्यंत 19 किलोग्रँम सिलिंडरसाठी दिल्लीत 2101 रुपये मोजावे लागत होते. चेन्नई 19 किलोग्रॅम एलपीजी गॅसची किंमत 2131 तर मुंबईमध्ये 1948.50 रुपये द्यावे लागतील. नवे दर लागू झाल्यापसून कोलकातमध्ये काॅमर्शियल गॅस सिलिंडर दर आजपासून 2076 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. (हेही वाचा, New Rules From 1st January 2022 : Online Food Delivery, ATM Transactions महागले; आज एक जानेवारीपासून बदलणारे हे नियम तुम्हाला माहिती आहेत का? घ्या जाणून)
नव्या वर्षात बदललेले शहरनिहाय सिलेंडर दर (14.2 Kg)
दिल्ली- 900
मुंबई- 900
कोलकाता- 926
चेन्नई- 916
लखनऊ- 938
जयपुर- 904
पटना- 998
इंदौर- 928
अहमदाबाद- 907
पुणे- 909
गोरखपुर- 962
भोपाल- 906
आगरा- 913
रांची- 957
नववर्षात गॅस कंपन्यांनी केलेली एलपीजी सिलेंडर दरकपातही केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरवर आहे. त्यातही ही कपात 19 किलो च्या सिलिडरवर आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही.