Winter 2019 (Photo Credits: IANS)

Cold in india: राजधानी दिल्ली (Delhi) शहरासह उत्तर भारतात थंडीचा कहर पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्ली शहरात तर गेल्या 119 वर्षांचा विक्रम मोडीत निघून पारा आणखी खाली घसरला आहे. हवामान विभागाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली शहरात सोमवारी तापमान 9.4 डिग्री सेल्सियस अंश इतके नोंदविण्यात आले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार डिसेंबर महिन्यातील हा सोमवार (30 डिसेंबर 2019) हा 1901 पासून आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान म्हणून नोंदवले गेले आहे. इ.स. 1901 मध्ये 9.4 इतक्या तापमानाची नोंद केली होती.

प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे की, सोमवारी नोंद झालेले तापमान हे या दिवसांमध्ये दिल्लीमध्ये असलेल्या आजवरच्या तापमानाच्या निम्मे आहे. हा आठवडा डिसेंबर महिन्यातील सर्वात कमी तापमान असलेला आठवडा म्हणून नोंदविण्यात आला. हवामान विभागाने दिलेल्या वृत्तानुसार दिल्ली शहरातील आयानगर येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. आयानगर मध्ये सोमवारी 7.8 अंश सेल्सीअस, लोधी रोड येथे 9.2 डिग्री अंश सेल्सीअस इतक्या तापमानाची नोंद झाली. (हेही वाचा, थंडीमुळे उत्तर प्रदेशात 68 जणांचा मृत्यू; 8 राज्यात 'रेड अलर्ट' जारी)

आयएमडी ट्विट

दरम्यान, थंडीच्या लाटेमुळे दिल्लीचे जनजिवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. नागरिकांच्या आयुष्यावरही प्रचंड परिणाम झाला असून, अनेक नागरिक आजारी पडले आहेत. त्यामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांची वाढ झाली आहे. लोकांना श्वसनाचे विकार होऊ लागल्याचे प्रकारही पुढे आले आहेत.