Eknath Shinde On Salman Khan:
CM Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर आज पहाटे गोळीबार झाला. दोन अज्ञात व्यक्तींनी सलमानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेवरुन राजकीय नेत्यांकडून विविध प्रतिक्रीया पहायला मिळत आहे. विरोधकांनी देखील या प्रकरणावरुन सरकारवर जोरदार टिका केली आहे.   अशाताच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या सर्व घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. (हेही वाचा - Salman Khan's House Firing: सलमान खानच्या घराबाहेर हल्लेखोर गोळीबार करतानाचा व्हिडिओ समोर, एका हल्लेखोराची ओळख पटली)

"ही दुर्दैवी घटना आहे.पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कायदा हातात घेणाऱ्यांना सोडले जाणार नाही."  असे  एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. गोळीबार घटनेनंतर एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला फोन केला होता. सलमानसोबत झालेल्या संवादाबद्दल देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले, "सलमान खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांना सूचित करण्यात आले आहे.

दरम्यान सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोनपैकी एका आरोपीची ओळख पटली आहे. विशाल उर्फ काळू असं आरोपीचं नाव असल्याचं कळतंय. सलमानच्या घराबाहेर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.