Salman Khan's House Firing: सलमान खानच्या घराबाहेर हल्लेखोर गोळीबार करतानाचा व्हिडिओ समोर, एका हल्लेखोराची ओळख पटली

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी सकाळी गोळीबार झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. तपासादरम्यान अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दोन्ही चोरटे दुचाकीवरून जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांची ओळख पटू शकत नाही. दोघांनीही डोक्यावर हेल्मेट घातले आहे. दरम्यान या दोन हल्लेखोरांपैकी एकाची ओळख पटली असून हा गुरगावच्या महाविरापुराचा रहिवाशी असून काळू असे त्याचे नाव आहे. (हेही वाचा - Raj Thackeray Salman Khan Meet: मनसेप्रमुख राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला)

पाहा व्हिडिओ -

मात्र, तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची जबाबदारी घेतली. त्यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये लिहिले आहे. सलमान खानसाठी "पहिला आणि शेवटचा इशारा" असे त्याचे वर्णन करण्यात आले आहे. पुढच्या वेळी "भिंतींवर किंवा रिकाम्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत" असा इशारा त्यांनी दिला. दोन दिवसांपूर्वीच ज्या गॅलरीत उभा राहून ईदच्या शुभेच्छा चाहत्यांना सलमान खान देताना दिसत होता, त्याच गॅलरीच्या आसपास हा गोळीबार करण्यात आलाय. हैराण करणारे म्हणजे एक गोळी सलमान खानच्या घरात गेल्याचेही काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

हल्लेखोरांना मुंबईच्या रस्त्यांबद्दल काहीच माहिती नव्हती. हल्लेखोरांनी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला कसे जायचे हे ऑटोवाल्यांना विचारले होते. या आरोपींची शेवटची लोकेशन ही मुंबईतील विलेपार्ले परिसरातील दाखवत आहे. पुढे ते दहिसराला गेल्याचेही कळतंय. यामुळे हे स्पष्ट आहे की, हल्लेखोर मुंबईतील नसून इतर राज्यातील आहेत.