दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) काल शेतकर्यांना भेटून आल्यानंतर त्यांना नजरकैदेत किंवा हाऊस अरेस्ट (House Arrest) केल्याचा दावा आम आदमी पक्षाकडून केला जात असताना आता दिल्ली विशेष पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या येण्या-जाण्यावर कोणताही प्रतिबंध नाही. सध्या केले जाणारे हे दावे तथ्यहीन आहेत. मुख्यमंत्री त्यांच्या नियमित मीटिंग्स करत आहेत. घराबाहेर पडत आहेत. दरम्यान केवळ अघटीत घटना घडू नये. सुरक्षा आणि कायदा व्यवस्था रहावी म्हणून अधिकची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दरम्यान आज सकाळी आम आदमी पार्टी कडून ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना गृहमंत्रालयाच्या आदेशावरून हाऊस अरेस्ट केल्याचं सांगितलं आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देखील अरविंद केजरीवाल काल सिंधू बॉर्डरवर अंदोलक शेतकर्यांना भेटून आल्यानंतर त्यांच्या घरी येण्या- जाण्यावर लोकांना अडवलं जात असल्याचं म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भारत बंदमध्ये शेतकर्यांना पाठिंबा देण्यावरून भाजपा घाबरलं असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे.
ANI Tweet
These claims are totally baseless & unfounded. There's absolutely no restriction whatsoever. CM has been meeting his usual engagements & has been moving out of his residence. There's adequate security in the area to maintain peace & to prevent untoward incident: Special CP, Delhi https://t.co/pc4WJAxZek pic.twitter.com/Sx6UfXpeDK
— ANI (@ANI) December 8, 2020
मनीष सिसोदिया प्रतिक्रिया
CM Kejriwal has been put under house arrest ever since he returned from Singhu Border. Entry/exit of people not being allowed.
BJP is scared that the CM will take to the streets in favour of #BharatBandh and speak for farmers. @msisodia #BJPHouseArrestsKejriwal pic.twitter.com/1oBwCZz4Nv
— AAP (@AamAadmiParty) December 8, 2020
काल सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सिंधू बॉर्डरवर शेतकर्यांच्या भेटीला गेले होते. तेथे त्यांनी प्रतिक्रिया देताना आपण आणि त्यांचा पक्ष शेतकर्यांच्या पाठिशी असल्याचं म्हटलं होतं. सोबतच दिल्ली मध्ये आंदोलक शेतकर्यांना अटक करून जेलमध्ये डांबण्यासाठी खुल्या मैदानांची परवानगी देखील मागितली होती. पण त्या दबावाखाली न झुकता परवानगी नाकारल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.