Sudhaa Chandran यांनी विमानतळावर कृत्रिम पाय काढून दाखवावा लागण्याच्या त्रासाची व्हीडिओ द्वारा मांडली व्यथा; CISF कडून माफीनामा
Sudha Chandran | PC: Twitter/Lili08688183

प्रसिद्ध नृत्यांगणा आणि अभिनेत्री सुधा चंद्रन (Sudhaa Chandran) यांनी सोशल मीडीयामध्ये व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक आवाहन केले आहे. दरम्यान 56 वर्षीय सुधा चंद्रन यांना विमानतळावर सिक्युरिटी चेकच्या प्रत्येक वेळेस कृत्रिम पाय (Prosthetic Limb) काढून दाखवण्यास सांगितलं जातं. त्यामुळे संतप्त सुधा चंद्रन यांनी वयोवृद्धांप्रमाणेच आपाल्यालाही एखादं कार्ड मिळावं अशी मागणी केली आहे. तसेच अशाप्रकारे मिळणारी वागणूक किती योग्य आहे? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

1981 साली सुधा चंद्रन यांचा तामिळनाडू मध्ये Tiruchirapalli जवळ मद्रास वरून येताना अपघात झाला होता. या अपघातामध्ये त्यांनी एक पाय गमावला. पण जिद्दीच्या बळावर पुन्हा पायावर उभं राहण्याची हिंमत ठेवलेल्या सुधा चंद्रन यांना कृत्रिम पाय बसवण्यात आला आहे.

सोशल मीडीयामध्ये व्हीडिओ पोस्ट करताना त्यांनी आपली हकिकत सांगताना ETD अर्थात Explosive Trace Detector द्वारा त्यांच्या कृत्रिम पायाची तपासणी करावी असं त्या CISF अधिकार्‍यांना सांगतात पण त्यांच्यासाठी प्रत्येकवेळी कृत्रिम पाय काढून दाखवायला सांगतात. मोदीजी सांगा हे मानवी दृष्टीने शक्य आहे का? तुम्हीच सांगा. हाच आपल्या समाजातील महिलांविषयींचा आदर आहे का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sudhaa Chandran (@sudhaachandran)

सुधा चंद्रन यांनी हिंदी, कन्नड, मल्याळी, तेलगू सोबतच मराठी भाषेतही काम केले आहे. सुधा चंद्रन यांनी भरतनाट्यम केले आहे. सुधा चंद्रन यांना नॅशनल फिल्म अवॉर्डने नावाजण्यात आले आहे. सुधा चंद्रन यांच्या आयुष्यावर मयुरी हा तेलगू सिनेमा देखील बनवण्यात आला आहे.

दरम्यान सुधा चंद्रन यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर CISF ने माफी मागितली आहे. सुधा चंद्रन यांना अशाप्रकारे कृत्रिम पाय का काढायला सांगितलं याची माहिती घेतली जाईल असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.