CIDCO (संग्रहित संपादित प्रतिमा)

Cidco News : शहरात घर असावे असे सर्वांचेच स्वप्न असते. काहींना मात्र, आर्थिक अडचणींमुळे ते स्वप्न पूर्ण करता येत नाही. अशातच आता सिडकोने घरांच्या किमती मोठ्या फरकाने कमी केल्या आहेत. सिडकोकडून जारी करण्यात आलेल्या अनेक गृहप्रकल्पांना ( CIDCO Housing Scheme) ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले आहे. नवी मुंबई (Navi Mumbai)आणि नजीकच्या भागांतील गृहप्रकल्पांमुळे बऱ्याचजणांचे हक्काच्या घरांचे स्वप्न साकार झाले आहे. सिडकोने घरांच्या किमती 6 लाखांनी कमी केल्या आहेत. (हेही वाचा : CIDCO Mass Housing Scheme: सिडकोची वर्षे 2024 साठी सामूहिक गृहनिर्माण योजना; नवी मुंबईमधील तळोजा आणि द्रोणागिरी मध्ये उपलब्ध होणार 3,322 सदनिका )

दोन वर्षांपूर्वी सिडकोनं नवी मुंबईच्या उलवे (Ulwe)भागामध्ये गृहनिर्माण योजना जाहीर केली होती. तेव्हा या घरांच्या किमती 35 लाख 30 हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आल्या होत्या. पण, घरांच्या किमती अधिक असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत अर्जदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे मदतीसाठी धाव घेतली. त्यावर निर्णय देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घरांच्या किमती 6 लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे घराची किंमत थेट 29 लाख 50 हजार रुपयांवर आली. त्याशिवाय, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असणाऱ्या अडीच लाखांचे अनुदान जोडल्यास घराची रक्कम थेट 27 लाख रुपयांपर्यंत पोहोचली. मात्र, आश्चर्याचीबाब म्हणजे ही रक्कम इतक्या मोठ्या फरकाने कमी झाली तरी अर्जदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. ( हेही वाचा : CIDCO Lottery 2023: नवी मुंबईत सिडको काढणार 5000 घरांची लॉटरी

)

सोडत प्रक्रियेमध्ये विजयी अर्जदारांनी अपेक्षित प्रतिसाद न दिल्यामुळे आता सिडकोपुढे अडचणी आणखी वाढल्या आहेत. गांभीर्याचीबाब म्हणजे ज्या अर्जदारांनी घरे घेण्यासाठी तयारी दर्शवली आहे. त्यांचा आकडा बराच कमी असल्यामुळे आता ही घरे सिडको येत्या काळात नाकारली जाण्याची शक्यता आहे. ती घरे नाकारली गेल्यास पुनर्विक्रीसाठी ती उपलब्ध करणार का? असा प्रश्न निर्माण होतो. जर तसे केल्यास त्या योजनेला कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सिडकोच्यावतीनं बामणडोंगरी येथे उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पांमधील घरांचे दर 6 लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्जदारांनाही याबाबतची माहिती देण्यात आली आहे. पण, सदर निर्णयाला एक महिना उलटूनही अद्याप ग्राहकांनी या घरांसाठी उत्साह दाखवलेला नाही. त्यामुळं आता यावर सिडको नवा तोडगा काढणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.