
Delhi CM Rekha Gupta Meets PM Modi: दिल्लीत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Delhi CM Rekha Gupta) अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. ऐतिहासिक रामलीला मैदानावर शपथ घेतल्यानंतर रेखा गुप्ता आपल्या मंत्र्यांसह यमुना घाटावर पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत कॅग अहवाल आणि आयुष्मान भारत योजनेसंदर्भात निर्देश दिले. आता रेखा गुप्ता यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. यापूर्वी रेखा गुप्ता यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली होती. पंतप्रधानांना भेटल्यानंतर त्या सचिवालयात पोहोचल्या.
अर्थसंकल्पाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा -
मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील भेटीत दिल्ली अर्थसंकल्पाच्या तयारीवर आणि महिला सन्मान योजनेसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने राजधानीतील लोकांना अनेक मोठी आश्वासने दिली होती. तसेच दिल्लीच्या जनतेलाही भाजपच्या नव्या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. (हेही वाचा - Rekha Gupta Delhi CM Oath: रेखा गुप्ता बनल्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री; रामलीला मैदानावर पार पडला शपथविधी सोहळा, 6 मंत्र्यांनीही घेतली शपथ)
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट -
Delhi CM Rekha Gupta meets PM Narendra Modi at his residence in Delhi.
(Pic Source: Delhi BJP) pic.twitter.com/sqlQjaDQWy
— ANI (@ANI) February 22, 2025
दरम्यान, रेखा गुप्ता यांनी शुक्रवारी दिल्ली विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पाच्या तयारीबाबत एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत वित्त विभागासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील. या बैठकीचा मुख्य उद्देश 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाला अंतिम स्वरूप देणे आणि विकास प्रकल्पांच्या प्राधान्यक्रमांवर चर्चा करणे हा आहे. (हेही वाचा: Delhi New CM Rekha Gupta: जाणून घ्या कोण आहेत दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता; उद्या रामलीला मैदानावर पार पडणार शपथविधी समारंभ)
तथापी, अर्थसंकल्पात मुख्यमंत्री रेखा गुप्ता अर्थसंकल्प लोककल्याण आणि विकासाभिमुख करण्यावर भर देतील. शिक्षण, आरोग्य, वाहतूक आणि पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. महिला सुरक्षा, तरुणांसाठी रोजगार निर्मिती आणि पर्यावरण संरक्षणाशी संबंधित तरतुदींवरही अर्थसंकल्पात विचार केला जाईल.
महिला सन्मान योजना -
दिल्लीतील महिलांना महिला सन्मान योजनेअंतर्गत दरमहा 2500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेचा उद्देश महिलांची आर्थिक स्थिती मजबूत करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे आहे. ही योजना महिलांच्या सन्मान आणि सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल, असा विश्वास रेखा गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.