Lockdown Extended: तेलंगाना मध्ये लॉकडाऊन 29 मे पर्यंत वाढविण्यात आल्याची मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी दिली माहिती

कोरोनाने भारतात हाहाकार माजविला असून दिवसागणिक कोरोना संक्रमितांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. मात्र तेलंगाना (Telangana) चे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत हा तेलंगाना मध्ये 29 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला असल्याची घोषणा केली आहे. भारतात सद्य स्थितीत कोरोना बाधितांची एकूण संख्या 46,711 वर पोहोचली असून एकूण 1,583 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात तेलंगाना मध्ये 1085 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 29 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच 585 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे.

यासोबत के चंद्रशेखर राव यांना तेलंगानातील नागरिकांना संबोधित करत लोकांनी संध्याकाळी 7 पर्यंत अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडता येणार असल्याचे सांगितले आहे. कारण सर्वसामान्यपणे लोकांनी 6 पर्यंत अत्यावश्यक वस्तू खरेदी केल्यास त्यांना घरी पोहोचेपर्यंत 7 वाजतील असा अंदाज धरून रात्री 7 वाजल्यापासून कर्फ्यू ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रात्री 7 नंतर कोणी रस्त्यावर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. Lockdown: सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री; लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

त्यासोबतच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अत्यावश्यक औषधे खरेदी करण्या व्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. त्याचबरोबर लहान मुलांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

जगभरात आतापर्यंत तब्बल 2,50,000 पेक्षाही अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी (Johns Hopkins University) मधील सेंटर फॉर सिस्टम साइंस एंड इंजीनियरिंग (सीएसएसई) ने जगभरातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे.