Chhattisgarh Naxal Attack: छत्तीसगडमधील नारायणपूर भागात नक्षलवादी हल्ला झाला. नक्षलवाद्यांनी शनिवारी अबुझमदच्या मोहंडी भागात आयईडी स्फोट घडवून आणला. ज्या स्फोटात ITBP चे 2 जवान शहीद झाले होते. नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार यांनी दोन्ही जवान जखमी झाल्यानंतर शहीद झाल्याची पुष्टी केली आहे. स्फोटाबाबत सांगितले जात आहे की, डीआरजी, बस्तर फायटर आणि एसटीएफचे जवान शोध मोहिमेवर गेले होते. त्यानंतर नक्षलवाद्यांनी हा स्फोट केला. यामध्ये हे दोन्ही जवान गंभीर जखमी झाले असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा - Five IndiGo Flights Receive Bomb Threat: इंडिगोच्या 5 विमानांना बॉम्बची धमक्या; सहा दिवसांत 70 विमानांना आले बनावट कॉल )
पाहा पोस्ट -
Two ITBP jawans killed in IED blast in Chhattisgarh's Narayanpur
Read @ANI Story | https://t.co/RYzNsCeq9M#ITBP #naxal #searchoperation pic.twitter.com/eNOmkxMwZK
— ANI Digital (@ani_digital) October 19, 2024
शहीद झालेले सैनिक महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचे रहिवासी
अमर पनवार, जिल्हा सातारा, महाराष्ट्र आणि राजेश, आंध्र प्रदेशातील कडप्पा, अशी शहीद जवानांची नावे आहेत. शोध मोहिमेदरम्यान कोडलियार गावाजवळील जंगलात आयईडीचा स्फोट झाल्याने दोन्ही जवान गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हा पोलिस दलाचे दोन कर्मचारीही जखमी
आयईडी स्फोटामुळे जिल्हा पोलिस दलातील दोन जवान जखमी झाले आहेत. या जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने कस्तुरमेटा कॅम्पवरून रायपूरला नेण्यात आले. जिथे दोन्ही जवानांवर उपचार सुरू आहेत.