Photo Credit- Pixabay

Superstition: छत्तीसगडमधील सुरगुजा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथे एका व्यक्तीने जिवंत कोंबडीचे पिल्लू गिळण्याचा प्रताप केला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आनंद यादव असे मृत तरूणाचे नाव आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गेला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मृत व्यक्ती कोणत्या तरी तांत्रिक (Tantra-Mantra)विद्येच्या(Superstition) संपर्कात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेमुळे अजूनही देशाच्या कामाकोपऱ्यात अघोही प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सुरगुजा जिल्ह्यातील दरिमा भागातील छिंदकालो गावात ही घटना घडली. येथे एका 35 वर्षीय तरुणाने जिवंत कोंबडीचे पिल्लू गिळण्याचा प्रयत्न केला. आनंद असे त्याचे नाव असून या जीवघेण्याच प्रयत्नामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. (Woman Kills Daughter Over Superstition: झारखंडमध्ये अंधश्रद्धेपोटी आईने केली पोटच्या मुलीची हत्या; काळीज चिरून खाल्ले, पोलिसांकडून अटक)

शवविच्छेदनादरम्यान डॉक्टरांना तरुणाच्या गळ्यात कोंबडीचे पिल्लू आढळले. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण निपुत्रिक होता, त्याने बाप होण्यासाठी हा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे.तरूणाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे कुटुंबीयांनी या तरुणाला रुग्णालयात नेले.(Uttar Pradesh Shocker: अंधश्रद्धेचा कळस! बुलंदशहरमध्ये 20 वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू; कुटुंबीयांनी मृतदेह दोरीने बांधून दोन दिवस गंगेत लटकवला (Watch Video))

मात्र डॉक्टरांच्या तपासणी करतानाच तो मृत असल्याचे सांगितले. तरुणाच्या गळ्यात कोंबडीचे पिल्लू होते. त्यामुळे त्याचा श्वासोच्छ्वास थांबला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा जादुटोणाशी संबंध जोडला जात आहे. बाप होण्यासाठी तरुणाने असे घातक कृत्य केल्याची भीती व्यक्त होत आहे.

पोस्टमार्टममध्ये पिल्लू आढळले

डॉक्टरांनी तरूणाचे शवविच्छेदन केले असता त्याच्या गळ्यात कोंबडूचे पिल्लू आढळले. कोंबडीच्या पिल्लाचाही मृत्यू झाला होता. परंतु त्याच्या शरीरावर जखमेचे कोणतेही चिन्ह नव्हते. कोंबडीचे पिल्लू पिसांसहीत त्याने गिळले होते. अंधश्रद्धेपोटी मृत व्यक्तीने असे पाऊल उचलल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सध्या समजते.