Uttar Pradesh Shocker: अंधश्रद्धेचा कळस! बुलंदशहरमध्ये 20 वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू; कुटुंबीयांनी मृतदेह दोरीने बांधून दोन दिवस गंगेत लटकवला (Watch Video)

दोन दिवस हे शरीर पाण्यात राहिले मात्र मोहित जिवंत झाला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी घाटावरच त्याचे अंत्यसंस्कार केले.

Uttar Pradesh Shocker: अंधश्रद्धेचा कळस! बुलंदशहरमध्ये 20 वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू; कुटुंबीयांनी मृतदेह दोरीने बांधून दोन दिवस गंगेत लटकवला (Watch Video)
Family Hangs Dead Body in Ganges For 2 Days

Family Hangs Dead Body in Ganges For 2 Days: यूपीच्या बुलंदशहरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे सर्पदंशामुळे मरण पावलेला तरुण जिवंत होण्याच्या आशेने त्याच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह दोरीने बांधून गंगेच्या पाण्यात लटकवला. मात्र बराच काळ उलटूनही हा तरुण जिवंत न झाल्याने अखेर दोन दिवसांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. अंधश्रद्धेच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रशासन मात्र याबाबत काहीही बोलण्यास टाळाटाळ करत आहे.

अहवालानुसार, 26 एप्रिल रोजी 20 वर्षीय मोहित नावाच्या तरुणाचा साप चावल्याने मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीय व ग्रामस्थ मोहितचा मृतदेह घेऊन गंगा काठावरील पुलाजवळ पोहोचले. गंगेच्या पाण्यात मृतदेह ठेवल्यास सापाच्या विषाचा प्रभाव नाहीसा होऊन मृत तरुण जिवंत होऊ शकतो, असे त्यांना कुणीतरी सांगितले होते. या आशेने त्यांनी मोहितचा मृतदेह दोरीने बांधून गंगेत लटकवला. दोन दिवस हे शरीर पाण्यात राहिले मात्र मोहित जिवंत झाला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी घाटावरच त्याचे अंत्यसंस्कार केले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा: Rajasthan Shocker: कोटामध्ये रील बनवण्याची क्रेझ ठरली जीवघेणी; बंदुकीसह व्हिडिओ शूट करताना तरुणाचा मृत्यू)

पहा व्हिडिओ-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 02, 2024 02:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).