Char Dham Yatra 2025 | X/@airnewsalerts

Char Dham Yatra 2025 Suspended: उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. सततच्या पावसामुळे नद्या वाहत असून काही ठिकाणी भूस्खलन होत आहे. त्यामुळे चार धामला जाणाऱ्या भाविकांना अनेक अडचणी येत आहेत. दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. पुष्कर धामी यांनी म्हटलं आहे की, खराब हवामान पाहता, चार धाम यात्रा (Char Dham Yatra 2025) तात्पुरती थांबवण्यात आली आहे. भविष्यात, आम्ही हवामानानुसार यात्रा पुढे सुरु ठेऊ. जेव्हा हवामान सुरळीत होईल, तेव्हा यात्रा पुन्हा सुरू केली जाईल. प्रवासादरम्यान आमची प्राथमिकता सर्व यात्रेकरूंची सुरक्षितता आहे. आमचे सर्व जिल्हा अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन पथके, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पूर्णपणे तयार आहेत, असंही धामी यांनी सांगितलं आहे.

चार धाम यात्रा तात्पुरती स्थगित - पुष्कर सिंह धामी

मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रेवर परिणाम -

दरम्यान, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ढिगारा आणि दगड पडल्याने विस्कळीत झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने सोनप्रयाग येथून केदारनाथ धाम यात्रा तात्पुरती थांबवली आहे. रुद्रप्रयागच्या मुंकटिया स्लाइडिंग झोनमध्ये भूस्खलन झाल्यानंतर डोंगरावरील ढिगारा आणि दगड संपूर्ण रस्त्यावर आले. खबरदारी म्हणून प्रशासनाने तात्पुरती यात्रा थांबवली. यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. (हेही वाचा - Landslides In Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे मोठे नुकसान; मंडी जिल्ह्यात 13 जणांचा मृत्यू)

सोनप्रयागमध्ये भूस्खलन

केदारनाथ धामहून परतणाऱ्या सुमारे 40 भाविकांना सोनप्रयाग भूस्खलन क्षेत्राजवळ एसडीआरएफने सुरक्षितपणे वाचवले. रात्री अचानक भूस्खलन झाल्यामुळे हे भाविक वाटेत अडकले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी रात्री 10 वाजता मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले, ज्यामुळे रस्ता बंद झाला. तथापी, अचानक ढिगारा कोसळल्याने अनेक भाविक तिथेच अडकले. या घटनेनंतर एसडीआरएफच्या पथकांना तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले. बचाव पथकाने यात्रेकरूंना सुरक्षित बाहेर काढले आहे.