Char Dham yatra. (Photo Credit: Wikimedia Commons)

उत्तराखंड सरकार (Uttarakhand Government ) कडून आजपासून सुरू होणार्‍या चार धाम यात्रेसाठी (Char Dham Yatra) विशेष नियमावली जारी केली आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर यंदा कडक निर्बंधांमध्ये भाविकांना चारधाम यात्रा करता येणार आहे. कोविड 19 निगेटीव्ह रिपोर्ट (COVID Negative Report)  पाहून आता भाविक या यात्रेमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. 4 नोव्हेंबर पर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. त्यामुळे यंदा तुम्ही देखील यामध्ये सहभागी होणार असाल तर पहा उत्तराखंड सरकार कडून देण्यात आलेली ही नियमावली. (नक्की वाचा: Chardham Yatra 2021: उद्यापासून चारधाम यात्रेला प्रारंभ; केदारनाथ मध्ये दररोज 800 तर बद्रीनाथ मध्ये 1200 भाविकांना दर्शनाची अनुमती).

Char Dham Yatra 2021 नियमावली

  • चारधाम पैकी बद्रीनाथ मध्ये दिवसाला एक हजार, केदारनाथला 800, गंगोत्रीला 600 तर यमुनोत्रीला 400 जणांना जाण्यासाठी परवानगी असणार आहे.
  • कोविड 19 लसीचे दोन्ही डोस घेतल्याला किमान 15 दिवस पूर्ण असावेत. RT/PCR/TrueNat/CBNAAT/RAT Covid test चे किमान 72 तास पूर्वीचा निगेटीव्ह रिपोर्ट आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र, केरळ, आंध्रप्रदेश मधून जाणार्‍या भाविकांना कोविड 19 चे दोन्ही डोस घेतले असले तरीही कोविड 19निगेटीव्हचा रिपोर्ट्स सादर करणं बंधनकारक आहे. हा देखील 72 तासांपेक्षा जुना नसावा.
  • 'कुंड' मध्ये शाही स्नान बंद असणार आहे. ठिकठिकाणी चेक पोस्ट उभारले आहेत.
  • दर्शनासाठी रजिस्ट्रेशन आणि ई पास दिला जाणार आहे. त्याशिवाय परवानगी दिली जाणार आहे.
  • www.devasthanam.uk.gov.in या वेबसाईट वर ई पास दिले जाणार आहेत. भाविकांना सरकारी अप्रुव्ह आयडी कार्ड्स, निगेटिव्ह रिपोर्ट्स अपलोड करावं लागणार आहे.
  • लहान मुलं, आजारी वृद्ध यांना परवानगी नसणार आहे.
  • मंदिरामध्ये एकावेळी 3 जणांना परवानगी दिली जाणार आहे.
  • मास्क घालणं देखील भाविकांना आवश्यक आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग पाहता उत्तराखंड सरकारने एप्रिल महिन्यात चारधाम यात्रेला स्थगिती दिली होती. परंतु, चार धामांचे कपाट निर्धारीत वेळेत खुले करण्यात आले होते. तसंच पुजारी नियमितपणे पूजा-पाठही करत होते. केवळ भक्तांना प्रवेश नाकारण्यात आला होता.