Chandrapur Food Poisoning: चंद्रपूरमध्ये महाप्रसादातून अनेकांना विषबाधा, एकाचा मृत्यू
Representational Image (Photo Credit: PTI)

चंद्रपूर जिल्ह्यात महाप्रसादतून 100 जणांना विषबाधा झाली आहे. भद्रावती (Bhadravati) तालुक्यातल्या माजरी गावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर महाप्रसाद घेतल्यानंतर जवळपास 100 जणांना त्रास सुरु झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. रामप्रेक्ष यादव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर अनेकांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आरोग्य यंत्रणाही कामाला लागली आहे.  (हेही वाचा - Mumbai News: बागेत खेळताना शॉक लागून अल्पवयीन मुलाचा मृत्यू, सोसायटीत चार सदस्यांवर गुन्हा दाखल, गोरेगाव येथील घटना)

चंद्रपूर जिल्ह्यात महाप्रसादातून 100 नागरिकांना विषबाधा झाली. भोजनानंतर सहभागी 100 लोकांना रात्री उशिरा मळमळ-उलटीचा त्रास झाल्यानंतर आसपासच्या वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड रुग्णालय, वरोरा उपजिल्हा रुग्णालय, स्थानिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी भेट दिली आहे.  माजरी येथे काल नवसाची पूजा होती. यानिमित्त रात्री जेवण ठेवण्यात आले होते. अंदाजे पाचशेच्या वर लोकांनी या पूजेला हजेरी लावली होती. त्यातील जेवलेल्या काही लोकांना ही विषबधा झाली आहे.

एका धार्मिक कार्यक्रमानंतरच्या महाप्रसादातून 100 नागरिकांना विषबाधा झाली. भद्रावती तालुक्यातल्या माजरी गावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर मंदिरात भोजनाचे केले होते. त्या वृद्ध व्यक्ती रामप्रेक्ष यादव (80) यांचा मृत्यू झालय. आयोजन, भोजनानंतर सहभागी 150 लोकांना रात्री उशिरा मळमळ-उलटीचा त्रास सुरु झाला. त्यानंतर अनेकांना आसपासच्या स्थानिक रुग्णालयात करण्यात आले.  सध्या पोलीस व आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर ठेवून आहेत.