Chandigarh Blast: आज सकाळी चंदीगडमधील (Chandigarh) रॅपर बादशाहच्या क्लबच्या बाहेर स्फोट झाला. पोलिसांनी सांगितले की, रॅपर बादशाहच्या सेव्हिल बार आणि लाउंज आणि चंदीगडमधील सेक्टर-26 मधील डीओरा क्लबच्या बाहेर हा स्फोट झाला. चंदीगडमध्ये पहाटे झालेल्या स्फोटाची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गोल्डी ब्रार (Goldy Brar)आणि रोहित गोदाराने स्वीकारली आहे. या दोन्ही शूटर्सनी सोशल मीडिया पोस्टद्वारे स्फोटाची जबाबदारी स्वीकारली. ज्या सिल्व्हर रेस्टॉरंटमध्ये हा स्फोट झाला त्या रेस्टॉरंटचा मालक रॅपर बादशाह असल्याचा दावा त्याने सोशल मीडिया पोस्टवर केला आहे.
रेस्टॉरंटच्या मालकाला खंडणीचा कॉल आला होता, मात्र त्याने तो रिसिव्ह केला नाही, असा दावा पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये क्लबच्या तुटलेल्या खिडक्या दिसत आहेत. स्फोटाची माहिती मिळताच चंदीगड पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाचा तपास सुरू केला. स्फोट झाला तेव्हा नाईट क्लब बंद होते. अशा परिस्थितीत हे बॉम्बस्फोट केवळ दहशत पसरवण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे मानले जात आहे.
गोल्डी ब्रार ने स्वीकारली बादशाहच्या सेव्हिली बार आणि लाउंजजवळ झालेल्या स्फोटाची जबाबदारी
The responsibility of the blast in Chandigarh has been taken by gangster Goldy Brar by posting on social media https://t.co/vwvWZ4S8Sz pic.twitter.com/vennizK6lF
— Ashu Aneja (@ashuaneja1) November 26, 2024
या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असे पोलिसांनी सांगितले. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये एक अज्ञात व्यक्ती बार-कम-लाउंजच्या दिशेने काहीतरी फेकताना दिसत आहे आणि त्यानंतर धुराचे ढग उठताना दिसत आहेत. पोलिसांनी सांगितले की त्यांना पहाटे 3.30 च्या सुमारास परिसरातून 'मोठा आवाज' येत असल्याची माहिती मिळाली. बादशाहने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सेव्हिल रेस्टॉरंट उघडले होते. (हेही वाचा: Morena House Blast: मोरेनामध्ये स्फोटामुळे घरे कोसळल्याची दुर्घटना; 4 जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती)
याबाबत सकाळपासून पोलीस तपासात व्यस्त आहेत. बॉम्ब फेकणाऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही स्कॅन करत आहेत. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून गोल्डीने पंजाबी गायकाची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या टोळीने अनेकवेळा सुपरस्टार सलमान खानला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. आता बादशाहच्या क्लबमध्ये स्फोट घडवण्यात आला.