Morena House Blast: मोरेनामध्ये स्फोटामुळे घरे कोसळल्याची दुर्घटना; 4 जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती (Watch Video)

मध्यप्रदेशातील मुरैना येथे एका घरात झालेल्या स्फोटात चार महिलांचा मृत्यू झाला. पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर ग्वाल्हेरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Morena House Blast: मोरेनामध्ये स्फोटामुळे घरे कोसळल्याची दुर्घटना; 4 जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती (Watch Video)
Photo Credit- X

Morena House Blast: मध्य प्रदेशातील मुरैना येथे रात्री 12.30 च्या सुमारास एका घरात अचानक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत चार महिलांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी ग्वाल्हेरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तुंच रोडवर असलेल्या राठोड कॉलनीतील मुन्शी राठोड यांच्या घरात हा स्फोट झाला. स्फोटामुळे जवळपास बांधलेली आणखी चार घरे कोसळली.

या दुर्घटनेत मुन्शी राठोड यांच्या घरात राहणारे भाडेकरू ढिगाऱ्याखाली दबून वैजयंती कुशवाह आणि त्यांच्या 45 वर्षांच्या मुलीचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. त्याशिवाय, राकेश राठोड यांच्या पत्नी विद्या राठोड यांचा मृत्यू झाला.वासुदेव राठोड यांची सून पूजा राठोड हिचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

मोरेनामध्ये स्फोटामुळे घरे कोसळल्याची दुर्घटना

दरम्यान, प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक जेसीबीच्या मदतीने घटनास्थळी बचावकार्यात करत आहेत. घरात ठेवलेल्या फटाक्यांमुळे हा स्फोट झाल्याचा संशय आहे. पोलीस अद्याप परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दुर्घटनेच खर कारण स्पष्ट झालं नाही. सध्या प्रशासनाचे उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी हजर असून जेसीबीच्या साहाय्याने घटनास्थळावरून मातीचे ढिगारे हटवण्यात येत आहे. यात बराच वेळ जात आहे. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूला मोठ्या संख्येने लोक जमा झाले. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून लोकांना तेथून हटवले.

(The above story first appeared on LatestLY on Nov 26, 2024 01:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).