देशातील राज्यांमध्ये आतापर्यंत 2.02 कोटीहून अधिक N95 मास्क, 1.18 कोटीपेक्षा जास्त PPE कीट्स,  6.12 कोटीहून अधिक HCQ टॅबलेट्स आणि 11,300 व्हेंटिलेटर्सचे  मोफत वाटप- भारत सरकार
Coronavirus in India | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात 1 एप्रिल पासून केंद्र सरकारने तब्बल 2.02 कोटीहून अधिक N95 मास्क (N95 Mask) आणि 1.18 कोटी हून अधिक पीपीई कीट्स (PPE Kits) राज्य, केंद्र शासित प्रदेश आणि केंद्र संस्थांना मोफत दिले आहेत. त्याचबरोबर 6.12 कोटीहून अधिक हाइड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या (Hydroxychloroquine) गोळ्यांचे वाटप केले आहेत. तर 'मेक इन इंडिया' (Make in India) अंतर्गत 11,300 व्हेंटिलेटर्स (Ventilators) पुरवण्यात आल्याची माहिती भारत सरकारने (Government of India) दिली आहे. देशात कोविड-19 संकट काळात सुरुवातीला मास्क आणि पीपीई कीटचा तुटवडा जाणवत होता. मात्र त्यानंतर हळूहळू या सेवा-सुविधांचा पुरवठा वाढवण्यात आला. तसंच कोविड-19 च्या जागतिक आरोग्य संकटात आवश्यक असणाऱ्या पीपीई कीट्स, एन 95 मास्क आणि HCQ टॅबलेट्स राज्यांना मोफत पुरवण्यात आल्या.

यापैकी आरोग्य मंत्रालयाकडून आतापर्यंत 7.81 लाख पीपीई कीट्स आणि 12.76 लाख एन95 मास्क दिल्लीला  तर 5.39 लाख पीपीई कीट्स आणि 9.81 लाख एन95 मास्क तामिळनाडूला पुरवण्यात आले आहेत. तर महाराष्ट्रात 11.78 लाख पीपीई कीट्स आणि 20.6 एन95 मास्क पुरवल्याची माहिती भारत सरकारकडून देण्यात आली आहे. (भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 6,25,544 वर; मागील 24 तासांत 20,903 नव्या रुग्णांची मोठी भर)

ANI Tweet:

देशातील कोरोना बाधितांचा आकडा 6,25,544 वर पोहचला आहे. त्यापैकी 2,27,439 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून 3,79,892 रुग्णांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. दरम्यान कोविड-19 ची बाधा झाल्यामुळे एकूण 18213 रुग्ण दगावले आहेत. देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणित वाढत असून महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली या ठिकाणी कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठा आहे.