Union Health Minister Harsh Vardhan (Photo Credits-ANI)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी अहोरात्र उपचार करत आहेत. परंतु वैद्यकिय कर्मचाऱ्यांना कोरोनाबाधित रुग्ण हाताळताना लागणारे पीपीई किट्स आणि मास्क यांची सुद्धा तितकिच गरज आहे. याच दृष्टीने आता केंद्र सरकारकडून राज्यांना 72 लाख N95 फेस मास्क आणि 36 लाख पीपीईट्सचा पुरवठा केल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिली आहे. तसेच 10 राज्यात/केंद्रशासित प्रदेशात गेल्या 24 तासात एकही कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आलेला नाही असे ही सांगण्यात आले आहे.

दिल्लीतील मंडोली परिसरातील कोविड सेंटरला आज हर्ष वर्धन यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी असे म्हटले आहे की, राज्यात आतापर्यंत 4362 कोविड सेंटर्स सुरु करण्यात आले आहेत. तर 346856 रुग्ण हे अल्प आणि अत्यल्प लक्षणे असलेली असून त्यांना तेथे ठेवण्यात आले आहे. जगात इतर प्रगत देशांप्रमाणे बिकट परिस्थिती निर्माण आपल्या देशात झालेली नाही. तरी सुद्धा आपण भयंकर परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी करत असल्याचे ही हर्ष वर्धन यांनी म्हटले होते.(Coronavirus in India: देशातील कोरोना व्हायरस रुग्णांचा रिकव्हरी रेट 29.9% तर मृत्यू दर 3.3% - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन)

दरम्यान, दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा 6542 वर पोहचला असून आतापर्यंत 73 जणांचा बळी गेला आहे. देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट पाहता सर्व स्तरातून मदतीचा हात पुढे येत आहे. तसेच केंद्र सरकारने स्थलांतरित कामगार आणि मजूर वर्गाला आपल्या जिल्ह्यात परत पाठवण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सुद्धा उपलब्ध करुन दिली आहे.