लवकरच चलनात येणार डिजिटल नोटा; ही असेल नोटांची खासियत
आरबीआय (Photo Credits: PTI)

काळा पैश्याला आळा घालण्यासाठी नोटबंदीसारखे मोठे पाऊल मोदी सरकारने उचलले. आता पुन्हा काळा पैशाला आवर घालण्यासाठी मोदी सरकार एक नवी योजना आखत आहे. लवकरच केंद्र सरकार (Central Government) डिजिटल नोटा (Digital Currency) चलनात आणणार आहे. यासंदर्भात, आर्थिक व्यवहार सचिवांच्या अध्यक्षितेखाली एक समिती नेमण्यात आली असून या समितीने आपल्या अहवालात डिजिटल नोटा चलनात आणण्याबाबत शिफारस केली आहे. आता या संदर्भात वित्त मंत्रालय लवकरच रिझर्व्ह बँकेशी चर्चा करेल आणि नंतर पंतप्रधान कार्यालयासोबत सल्लामसलत करून अंतिम निर्णय घेण्यात येईल. समितीनुसार, डिजिटल नोटा चलनात आणण्यासाठी क्वाईन अॅक्ट आणि आरबीआय अॅक्टमध्ये बदल करणे गरजेचे आहे.

डिजिटल नोटांचा निर्णय प्रत्यक्षात उतरल्यास आपण ज्या नोटा वापरतो त्या सोबतच डिजिटल नोटाही चलनात येतील. या नोटा कागदी नोटांप्रमाणेच असतील. त्यावर व्याजही मिळेल. तसंच यामुळे काळा पैसा ट्रॅक करण्यास मदत होईल.

कागदी नोटांप्रमाणे या डिजिटल नोटांवरच्या वितरणावरही रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (Reserve Bank of India) नियंत्रण असेल. मात्र डिजिटल नोटांच्या वितरणाबाबतीत गोपनीयता बाळगली जाईल. डिजिटल नोटा तुम्ही मोबाईल वॉलेट, अकाऊंटमध्ये ठेवू शकता. 75 रुपयांचं नाणं लवकरच चलनात ; ही आहे नाण्याची खासियत

दोन प्रकारच्या असतील डिजिटल नोटा

पहिल्या प्रकारातील डिजिटल नोटांवर व्याज मिळणार नाही आणि त्याची किंमती आहे तितकीच राहील. तर दुसऱ्या प्रकारातील नोटांवर व्याज मिळेल. याचा वापर तुम्ही गुंतवणूकीसाठी करु शकता. याचा अर्थ डिजिटल नोट एखाद्याकडे जितक्या काळापासून असेल. त्या कालावधीच्या आधारावर त्या व्यक्तीला व्याज मिळेल.