रुपयाचे चिन्ह (Photo Credits: Pixabay)

लवकरच केंद्र सरकार 75 रुपयांच नाणं चलनात आणणार आहे. अर्थ मंत्रालयाने या संदर्भात माहिती दिली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे पहिल्यांदा तिरंगा फडकवल्याच्या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे 30 डिसेंबर, 1943 रोजी पहिल्यांदा तिरंगा फडकवला होता.

काय आहे नाण्याची खासियत ?

# 75 रुपयांच नाणं हे 35 ग्रॅम वजनाचं असेल. हे नाणं 50% चांदी, 40% तांबे, 5% झिंक आणि 5% जस्तपासून बनलेले असेल.

# या नाण्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा असेल. सेल्युलर जेलच्या मागे तिरंग्याला सलामी देणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा नाण्यावर पाहायला मिळणार आहे.

# नेताजींच्या प्रतिमेखाली 75 हा अंक लिहिलेला असेल. त्याचबरोबर नाण्यावर देवनागरी आणि इंग्रजीत 'प्रथम ध्वजारोहण दिवस' असं लिहिलेलं असेल.

75 रुपयांचे नाणं कसं असणार याबाबत जनतेच्या मनात उत्सुकता अाहेच. त्याचबरोबर यामुळे व्यवहार अधिक सोपा होण्यास मदत होईल.