New Yoga Protocol: स्वत:ला तणावमुक्त करण्यासाठी आणि ताजेतवाने राहण्यावर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी 'वाय-ब्रेक - ऑफिस चेअरवर योग' (Y-Break - Yoga at Office Chair) या नवीन योग प्रोटोकॉलचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्राने आपल्या कर्मचार्यांना तणावमुक्त करण्यासाठी, ताजेतवाने आणि पुन्हा फोकस करण्यासाठी अल्प कालावधीसाठी 'वाय-ब्रेक - ऑफिस चेअरवर योग' करण्यास सांगितले आहे.
एका आदेशात, कार्मिक मंत्रालयाने (personnel ministry) केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांना/विभागांना कामाच्या ठिकाणी लोकांसाठी हा नवीन योग प्रोटोकॉल स्वीकारण्यास आणि त्याचा प्रचार करण्यास सांगितले आहे. ''कामाच्या ठिकाणी वाय-ब्रेकची सुरुवात आयुष मंत्रालयाने कामाच्या ठिकाणी तणावमुक्त, ताजेतवाने आणि पुन्हा लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने केली आहे. केंद्राच्या या प्रोटोकॉलला मिळणारा प्रतिसाद उत्तम असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा, आयुष मंत्रालयाने अधिका-यांसाठी नवीन गोष्टी आणल्या आहेत. जे कर्मचारी त्यांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे बाहेर जाऊन योगाभ्यास करू शकत नाहीत. त्यांच्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. 12 जून रोजीच्या आदेशात म्हटले आहे की, अधिकारी आता त्यांच्या कार्यालयातील खुर्चीवर बसून ताजेतवाने, तणावमुक्त करण्यासाठी आणि रीफोकस करण्यासाठी खुर्चीवर ''Y-Break@workplace योगा'' या अल्प कालावधीच्या योग प्रोटोकॉलचा सराव करून स्वतःचा फायदा घेऊ शकतात. (हेही वाचा, उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी दररोज 'ही' 5 योगासने करा)
"Y-Break@workplace - योग ॲट चेअर" बद्दल जागरूकता पसरवण्यासाठी, भारत सरकारने केंद्राच्या सर्व मंत्रालये/विभागांना त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये, त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या संलग्न आणि अधीनस्थ कर्मचाऱ्यांमध्ये व्यापक प्रसार करण्याची विनंती केली आहे. कार्मीक मंत्रालयाने काढलेल्या एका आदेशामध्ये प्रोटोकलची युट्यूब लिंक देखील दिली आहे. या लिंक खालीलप्रमाणे
- https://youtu.be/2zBEUqc7nCc
- https://youtu.be/aqYJR8HnSJI
- https://youtu.be/I8YBnxWjHbg
- https://yoga.ayush.gov.in/Y-Break/
आयुष मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, योगा ब्रेक (वाय-ब्रेक) प्रोटोकॉल व्यावसायिकांना तणावमुक्त, ताजेतवाने आणि पुन्हा लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. यात काही 'हलक्या' आसनांचा समावेश आहे. ही आसने कर्मचारी कामातून काही मिनिटांचा ब्रेक घेऊन करता येतात. प्रोटोकॉलमध्ये काही सोप्या योग पद्धतींचा समावेश आहे ज्यात 'आसन' , 'प्राणायाम' आणि 'ध्यान' यांचा समावेश आहे, मंत्रालयाने नमूद केले आहे.