Ram Chander Chhatarpati Murder Case: राम चंदर छत्रपती (Ram Chander Chhatarpati) या पत्रकाराच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) यांना दोषी ठरवण्यात आलं होते. आज राम रहीमला या प्रकरणी जन्मठेप शिक्षा सुनावली आहे. 15 वर्षांनंतर ही सुनावणी करण्यात आली आहे. बलात्कार आणि हत्येचे खटले राम रहीमवर सुरू आहेत. पंचकुला येथील सीबीआयच्या स्पेशल कोर्टामध्ये या शिक्षेची सुनावणी करण्यात आली आहे.
Journalist Ramchandra Chhatarpati murder case: CBI Special Court in Panchkula awards life imprisonment to Gurmeet Ram Rahim Singh. pic.twitter.com/O7WG4lBIPR
— ANI (@ANI) January 17, 2019
राम रहीम सह अन्य तीन आरोपी कुलदीप सिंग, निर्मल सिंग आणि कृष्ण लाल यांनादेखील जन्मठेप सुनावण्यात आली असून त्यांना प्रत्येकी 50,000 रूपयांचा दंड भरावा लागणार आहे.
काय आहे प्रकरण?
2002 साली पत्रकार रामचंद्र छत्रपती यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचे प्रकरण 2003 साली सीबीआयकडे देण्यात आले. 2007 साली या प्रकरणातील चार्जशीट दाखल झाली. त्यावेळेस डेरा सच्चाचे प्रमुख गुरमीत सिंह राम रहीम यांच्यांवर हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला.