Canara Bank ने आता 'या' कामासाठी सुरु केले वेगळे App, ग्राहकांना बँकेत जावे लागणार नाही
Bank (Photo Credit: PTI)

कॅनरा बँकेने  (Canera Bank) आपल्या ग्राहकांसाठी एक नवी सुविधा सुरु केली आहे. या नव्या सुविधेचा वापर करुन त्यांना बँकेत जाण्याची गरज भासणार नाही आहे. त्यामुळे घरुनच बँकेची कामे आता करणे सोप्पे होणरार आहे. बँकेने ग्राहकांना पासबुक प्रिंट करण्यासाठी बँकेत येण्यास सांगितले होते. मात्र आता हे काम घरबसल्याच केले जाऊ शकते. खरंतर बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक नवे अॅप सुरु केले आहे. त्याच्या माध्यमातून पासबुक आणि खात्याचे स्टेटमेंट संबंधित काम तुम्ही सोप्प्या पद्धतीने करु शकता.

तर जाणून घ्या कॅनरा बँकेच्या अॅपमध्ये कोणते फिचर्स दिले गेले आहेत. तसेच याचा वापर कशा पद्धतीने तुम्ही करु शकता. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पुढील काही महत्वाच्या गोष्टी जरुर लक्षात ठेवा.(LIC IPO: मार्च महिन्यापूर्वी येणार देशातील सर्वात मोठा आयपीओ, जाणून घ्या सरकारच्या प्लॅनबद्दल अधिक)

कॅनरा बँकेच्या या नव्या अॅपचे नाव Canara e-passbook असे आहे. या अॅपची खासियत अशी आहे की, ते युजर फ्रेंडली असून तुम्ही कोणत्याही समस्येशिवाय वापरु शकता. तुम्ही एका ओटीपीच्या माध्यमातून यासाठी रजिस्ट्रेशन करु शकता. याच्या माध्यमातून तुम्ही सेविंग डिपॉझिट आणि कर्ज खाते ट्रॅक करु शकता. येथे तुम्हाला रियल टाइम अपडेट मिळणार आहे. बँक हॉलिडे बद्दल सुद्धा माहिती या अॅपमध्ये तुम्हाला दिली जाणार आहे. त्याचसोबत माहिती तुम्ही व्हॉट्सअॅप किंवा मेलच्या माध्यमातून पाठवू शकता. यासाठी एक खास ऑप्शन दिला आहे. या नव्या अॅपमुळे ग्राहकांना पासबुकमध्ये एन्ट्री करण्यासाठी बँकेत जावे लागणार नाही आहे. तुम्ही गरजेनुसार तारीख निवडून त्या तारखेपर्यंतचे स्टेटमेंट डाउनलोड करु शकता.

Tweet:

दरम्यान, नुकत्याच सिंडिकेट बँकेने कॅनेरा बँकेत विलिकरण केले आहे. त्यामुळे सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना IFSC CODE बदल करण्यात आल्याचे सांगितले आहे. आयएफएससी कोड बदलून खुप वेळ झाला असला तरीही 1 जुलै पर्यंतच्या जुन्या कोडच्या माध्यमातून ट्रांजेक्शन करता येणार आहेत. त्यानंतर लोकांना नवा आयएफएससी कोड सर्व ठिकाणी अपडेट करावा लागणार आहे. असे न केल्यास तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे येण्यास बंद होईल.