दिल्ली-मुंबईच्या (Delhi-Mumbai) विमानातून प्रवास करणाऱ्या एका अभिनेत्रीचा लैंगिक छळ करणाऱ्या गाजियाबाद मधील व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. महिलेने कॅबिन क्रु ला याबद्दल अलर्ट करत त्यांनी पोलिसांना कळवावे असे म्हटले. 40 वर्षीय मुंबईत राहणारी महिला दिल्लीत 1 ऑक्टोंबरला गेली होती. तर 3 ऑक्टोंबरला ती मुंबईत परत येणार होती. विमान छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 11 वाजता उतरले. तेव्हा आपले सामान काढण्यासाठी ती उभी राहिली.
दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने पाठून येत तिची कंबर पकडली आणि त्याच्या बाजूला तिला खेचले. या प्रकारामुळे तिने संताप व्यक्त केला. त्या व्यक्तीला ती महिला नसून पुरुष असल्याचे वाटले. यावर महिलेने कॅबिन क्रु ला त्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई करण्यासाठी सांगितले. त्याचवेळी कॅबिन क्रु ने सुद्धा त्या व्यक्तीला समोर येण्यास सांगितले असता त्याचे नाव, क्रमांक आणि सीट क्रमांक मागितला. प्रवाशांनी क्रु ला राजीव असे त्या व्यक्तीचे नाव असल्याचे सांगितले.(Ahmedabad Sexual Abuse Case: अनैसर्गिक संभोगाची मागणी करणाऱ्या पतीविरोधात पत्नीची पोलिसात तक्रार, आरोपीस अटक)
एफआयआर दाखल केल्यानंतर सहार पोलिसांनी राजीव याची पूर्ण माहिती मागवली. त्यांनी राजीवसोबतच्या अन्य जणांची माहिती सुद्धा पोलिसांना दिली. पोलिसांनी जेव्हा याबद्दल चौकशी केला असता राजीव याने त्याने तसे केलेच नसल्याचे म्हटले. त्याचसोबत राजीव याने त्याच्यासह प्रवास करणाऱ्यांचे फोटो सुद्धा पाठवले. तेव्हा फोटो महिलेला दाखवला असता तिने तो व्यक्ती नसल्याचे म्हटले. त्यावेळी अन्य एका प्रवाशाची नितीन बी अशी ओळख पटली. त्यानेच तिचा विनयभंग केला होता. तर पोलिसांनी उलट तपासणी केली असता विनयभंग केलेला व्यक्ती नितीन असल्याचे कळले.
पोलिसांनी नितीन याला 14 ऑक्टोंबरला अटक केली आहे. त्याच्या विरोधात आयपीसी कलम लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भोईवाडा कोर्टात महिलेने केलेल्या तक्रारीनुसार ही केस दाखल केली आहे.