Budget 2020: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली मोठी घोषणा; LIC मधील सरकार विकणार आपला हिस्सा
Union Budget 2020 (Photo Credits: File)

सर्वांचे लक्ष लागून राहिलेले केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या बजेटमध्ये एक मोठी घोषणा केली आहे. सरकार LIC मधील आपला हिस्सा विकणार असून LIC चे IPO सुद्धा येईल. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर लोकसभेत विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ केला. त्याचबरोबर अर्थमंत्र्यांनी IDBI बँकेच्या उरलेल्या रकमेला Stock Exchange मध्ये विकले जाईल.

अर्थमंत्री अशीही घोषणा केली की, बँकांमध्ये जमा केलेली 5 लाखांपर्यंत असलेली रक्कम सुरक्षित राहील. याआधी केवळ 1 लाख रुपयांची मर्यादा होती. या वर्षात खर्चाचे अनुमान 26 लाख कोटी इतके आहे. Education Budget 2020 Highlights: केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रात काय मिळाल्या सुविधा; वाचा सविस्तर

तसेच आयकर बाबतीतही मोठी घोषणा करण्यात आली. आता 5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त कर भरावा लागणार नाही. तर 5 ls 7.5 लाखांपर्यंतचे त्या वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 10% टॅक्स भरावा लागेल.

तर 7.5 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना 15% टॅक्स भरावा लागेल. 10 ते 12.5 लाखांपर्यंत 20%, 12.5 ते 15 लाखांपर्यंत 25% तर 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना आधीप्रमाणे 30% टॅक्स भरावा लागेल. 15 लाखांच्या वर उत्पन्न असलेल्यांच्या टॅक्स मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.